
no images were found
एसआयपी अकॅडमी कडून भारतातील १००० पेक्षा जास्त
वंचित मुलांसाठी शैक्षणिक मदत जाहीर
मुंबई: वंचित मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सामाजिक प्रभाव उपक्रमांची घोषणा आज एसआयपी अकॅडमी ने केली. एसआयपी अकॅडमी ही आता उत्तम कामगिरी करत असल्याने विशेषत: वंचित पार्श्वभूमीतील मुलांना आधार देण्यावर संस्थेचा भर आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून दिसून आल्याप्रमाणे, महामारीमुळे हे आव्हान आणखी तीव्र झाले आहे. एसआयपी अकॅडमीच्या भारतातील कामकाजाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश व्हिक्टर यांनी ही घोषणा केली.
एसआयपी फाउंडेशनच्या माध्यमातून ही संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांमधील कौशल्य विकासासाठी भारतभर अनेक उपक्रमांना पाठिंबा देत आहे. संपूर्ण भारतभरातील एसआयपी अकॅडमी कार्यक्रमांतर्गत, महामारीच्या काळात ज्यांचे पालक वारले होते अशा एकूण १४८ एसआयपी विद्यार्थ्यांना १२ महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या मासिक शुल्कात फी माफी दिली जात आहे. याशिवाय वंचित वर्गातील २२५ बालकांना ७५ टक्के पर्यंत फी सवलत दिली जाणार आहे. ही मदत देशभरातील १५ राज्यांमध्ये ४५ एसआयपी अबॅकस केंद्रांमध्ये उपलब्ध आहे.