no images were found
डिकेटीईच्या तब्बल १६ टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची एबीएफआरएल (अदित्य बिर्ला)या नामांकित कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी(प्रतिनिधी) : येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल मधील बी.टेक, डिप्लोमा विभागात शिक्षण घेणा-या सोळा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत एबीएफआरएल (अदित्य बिर्ला) कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी एबीएफआरएल (अदित्य बिर्ला) येथे विविध पदांवर लवकरच रुजू होणार आहेत. अदित्य बिर्ला कंपनी ही डीकेटीई संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना प्रत्येकवर्षी कॅम्पस इंटरव्हूव मार्फत निवड करीत आहे.
एबीएफआरएल (अदित्य बिर्ला) ही फॅशन ब्रँडस आणि रिटेल फॉर्मेटसची वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी असून पिटर इंग्लड, रिबॉक, लुयिस फिलीप, वानहुसेन, ऍलेनसोली इ. नामवंत ब्रँडसाठी उत्पादन निर्मितीतील सर्वात अग्रेसर कंपनी आहे. दरवर्षी ही कंपनी डिकेटीईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी भेट देत असते. या कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्हयुव आयोजित केला होता त्यामध्ये रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयू अशा अनेक फे-यांमधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेवून त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली. अदित्य बिर्ला कंपनीमध्ये निकिता महाले, आकांक्षा घडवीर, श्रावणी पाटील, मैथली गोरे, सिध्दी बनकर, अभय पाटील, गिरीराज गटटाणी, अजय बोलुरे, यश चचडी, ओंकार जंगले, सायली गुडाळे, वेदिका पटेल, सानिया माळी, वेदिका कमलेश पटेल, अदित्य माने, रुचा पाटील या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना दोन महिन्याची इंटरनशिप अकर्षक विद्यावेतनावर पूर्ण झाली आहे.
महाविद्यालयास युजीसी व शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त (एम्पॉवर्ड ऍटोनोमॉस) दर्जा मिळाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना होत आहे. तसेच डीकेटीईच्या टेक्साटाईल विभागातील माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईच्या टेक्सटाईल विभागातील प्लेसमेंट हे शंभर टक्के होत आहेत.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे , उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.