Home सामाजिक गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शनचे टिकाऊ एएसी ब्‍लॉक्‍सच्‍या माध्‍यमातून कोल्‍हापूरमध्‍ये विकासाचे लक्ष्‍य

गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शनचे टिकाऊ एएसी ब्‍लॉक्‍सच्‍या माध्‍यमातून कोल्‍हापूरमध्‍ये विकासाचे लक्ष्‍य

5 min read
0
0
19

no images were found

गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शनचे टिकाऊ एएसी ब्‍लॉक्‍सच्‍या माध्‍यमातून कोल्‍हापूरमध्‍ये विकासाचे लक्ष्‍य

 

कोल्हापूर, : गोदरेज अँड बॉयसने घोषणा केली की, कंपनीचे व्‍यवसाय युनिट गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शनचा त्‍यांचे ऑटोक्‍लेव्‍ह्ड एरेटेड काँक्रीट (एएसी) ब्‍लॉक्‍स आणि संबंधित उत्‍पादनांचा पुरवठा करून कोल्‍हापूर व आसपासच्‍या प्रदेशामध्‍ये वार्षिक २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ करण्‍याचा मनसुबा आहे. हवामान बदलाच्‍या वाढत्‍या समस्‍यांसह भारतातील रिअल इस्‍टेट व बांधकाम उद्योग प्रतिकूल पर्यावरणीय परिणामाचे निराकरण करण्‍यासाठी शाश्‍वत बांधकाम साहित्‍याच्‍या श्रेणीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करत आहे.  

गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शन या परिवर्तनामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, तसेच आपल्‍या शाश्‍वत बांधकाम साहित्‍याच्‍या पोर्टफोलिओच्‍या माध्‍यमातून प्रमुख रिअल इस्‍टेट आणि पायाभूत सुविधा प्रकल्‍पांप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे. गोदरेज टीयूएफएफ एएसी ब्‍लॉक्‍स पारंपारिक विटांना पर्यावरणास-अनुकूल पर्याय देतात. कोळसा-आधारित वीज निर्मितीचे उप-उत्‍पादन फ्लाय अॅशचा पुनर्वापर करत एएसी ब्‍लॉक्‍सची निर्मिती केली जाते, ज्‍यामुळे भूजल आणि सुपीक शेतजमिनीचे प्रदूषण टाळण्‍यासाठी फ्लाय अॅशची योग्‍यरित्‍या विल्‍हेवाट लावण्‍यास मदत होते. विशेष म्‍हणजे, गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शनने मुंबई कोस्‍टल रोड प्रकल्‍पासाठी ४०० हून अधिक मोठ्या प्रीकास्‍ट काँक्रीट बॉक्‍स कल्‍व्‍हर्टचा पुरवठा केला आहे. जे १० टक्‍के रिसायकल केलेले काँक्रीट असलेल्‍या काँक्रीट मिश्रणाचा वापर करत तयार करण्‍यात आले. 

गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शनचे कार्यकारी उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख अनुप मॅथ्‍यू म्‍हणाले, ”गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शनमध्‍ये आम्‍ही शाश्‍वत बांधकाम वातावरण निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. एएसी ब्‍लॉक्‍स, रेडी मिक्‍स प्‍लास्‍टर आणि बाइंडिंग मोर्टर यांसारख्‍या वॉलिंग व पेव्हिंग सोल्‍यूशन्‍सची आमची श्रेणी आम्‍ही कार्यरत असलेल्‍या बाजारपेठांमध्‍ये ‘गोदरेज टीयूएफएफ’ म्‍हणून ओळखली जाते. पर्यावरणीय स्थिरतेप्रती आमच्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत आमची वॉलिंग उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी आहे, जे आयजीबीसी ग्रीनप्रो प्रमाणित आहेत. ही उत्‍पादने ग्रीन बिल्डिंग्‍ज विकसित करण्‍यासाठी देखील लाभदायी आहेत. कोल्‍हापूर, गोवा, नागपूर, इंदौर यांसारख्‍या विकसित होत असलेल्‍या शहरांमध्‍ये विस्‍तार करत आमचा या बाजारपेठांमधील टिकाऊ बांधकाम साहित्‍यासाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही ग्राहकांना सर्वोत्तम रिअल इस्‍टेट मालमत्ता विकसित करण्‍यामध्‍ये साह्य करत त्‍यांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍याचा सतत प्रयत्‍न करतो.”  

गोदरेज अँड बॉयसच्‍या १२७ वर्षांच्‍या वारसाचा भाग असलेल्‍या गोदरेज कन्‍स्‍ट्रक्‍शनने दशकभरात ग्राहकांचा विश्‍वास व निष्‍ठा संपादित केली आहे. राष्‍ट्र-निर्मिती व शाश्‍वततेप्रती स्थिर कटिबद्धतेसह कंपनी विश्‍वास व कौशल्‍याच्‍या वारसाचा फायदा घेत टिकाऊ, उच्‍च दर्जाची बांधकाम सामग्री देते, जे आधुनिक भारतीय पायाभूत सुविधेचे आधारस्‍तंभ आहेत. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एकनाथ शिंदे यांना भाजप कडून कडून दोन ऑफर!

एकनाथ शिंदे यांना भाजप कडून कडून दोन ऑफर! राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…