
no images were found
कृषिदिनानिमित्त अन्नदात्ता शेतकऱ्यांचा केर्ली येथे कृषिकन्यांकडून गौरव
कोल्हापूर : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरद्वारा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम – 2024 (खरीप) अंतर्गत कृषी दिनानिमित्त केर्ली येथे कृषी कन्यांकडून अन्नदात्यांचा गौरव करण्यात आला.
कृषी दिनाचे औचित्य साधून कृषीकन्यांनी केर्ली येथील मंदिर सभागृहात कृषी चर्चासत्र राबविले. यामध्ये शेती करत असताना किड व रोग नियंत्रणापासून ते आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानापर्यंत उद्भवलेले प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले. कार्यक्रमास सरपंच विजयमाला चौगले, उपसरपंच कृष्णात नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमास सर्जेराव पाटील व दिपक पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीकन्या मयुरी माने, सलोनी पाटील, वृषाली पाटील, निकिता रापतवार, साक्षी सांगळे, रियांजली सोरटे यांनी प्रयत्न केले. कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.डी.बनसोड, समन्वयक डॉ. बी.टी.कोलगणे व कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.जे.वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.