no images were found
महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांसाठी इक्विटी म्युच्युअल फंड्स मोलाचे: टाटा ऍसेट मॅनेजमेंट
कोल्हापूर: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाकडील माहितीनुसार, मे २०२४ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये ३४६९७ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली, एप्रिल २०२४ च्या तुलनेत तब्बल ८३% ची वाढ दिसून आली आहे. याच महिन्यातील एएमएफआयच्या माहितीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंड्स सेगमेंटमध्ये थेमॅटिक किंवा सेक्टरल फंड्स कॅटेगरीमध्ये देशभरातील गुंतवणूकदारांनी १९२१३.४ कोटी रुपये गुंतवले. मे २०२४ मधील एएमएफआयच्या माहितीतील अजून एक रोचक बाब म्हणजे एसआयपीमार्फत मासिक गुंतवणुकीने सलग दुसऱ्या महिन्यात २०,००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
गुंतवणूकदारांनी विविध इक्विटी योजनांवर पुन्हा विश्वास ठेवल्याने भारतामध्ये म्युच्युअल फंड्स संपत्तींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. टाटा म्युच्युअल फंडामध्ये देखील महाराष्ट्रात हाच ट्रेंड दिसून आला आहे, गुंतवणूकदारांनी त्यांच्या इक्विटी म्युच्युअल फंड योजनांना प्राधान्य दिले आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांनी टाटा म्युच्युअल फंडाच्या आर्बिट्रेज फंडसहित विविध इक्विटी योजनांमध्ये ४,१८५ कोटी रुपये गुंतवले आहेत.
याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांनी टाटा ऍसेट मॅनेजमेंटच्या लार्ज-कॅप फंड आणि लार्ज व मिड-कॅप फंडमध्ये २७६ कोटी रुपये गुंतवले तर बँकिंग व फायनान्शियल सर्व्हिसेस तसेच फ्लेक्सी कॅप फंड्समध्ये अनुक्रमे ७५ कोटी आणि ३२ कोटी रुपये गुंतवले.
एएमएफआयकडील नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, मिड आणि स्मॉल-कॅप सेगमेंट्समध्ये संपूर्ण भारतभरातील गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे. १ वर्षभरात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप इन्डायसेसनी लार्ज-कॅप इंडेक्सपेक्षा सरस कामगिरी बजावली आहे. मे २०२४ च्या एएमएफआय माहितीनुसार, मिड-कॅप फंड्समध्ये २७२४.६७ कोटी रुपयांची तर स्मॉल-कॅप फंड्समध्ये २६०५.७० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. तर लार्ज-कॅप फंड्समध्ये गुंतवणूकदारांनी विशेष रस दाखवला नाही, ६६३ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. पुढील काळात व्यापक बाजारपेठ अधिक संतुलित होण्याची शक्यता आहे कारण लार्ज-कॅपमध्ये रिस्क-रिवॉर्ड तुलनेने आकर्षक होईल.
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर (इक्विटीज) श्री अमेय साठे म्हणाले, “मॅक्रोइकॉनॉमिक इंडिकेटर्स, ब्रॉड-बेस्ड कॉर्पोरेट उत्पन्नातील वृद्धी आणि प्रचंड मोठ्या बँकिंग/कॉर्पोरेट क्षेत्राचे आरोग्य हे प्रमुख घटक आहेत जे बाजारपेठेसाठी दीर्घकालीन पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये योगदान देतात. लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप शेयर्समध्ये गुंतवणूक आपल्या विवेकानुसार करता येत असल्याने फ्लेक्सी कॅप क्षेत्रात अनेक संधी आहेत. उत्तम ईपीएस ग्रोथ आऊटलूक आणि योग्य मूल्यांकन यामुळे आम्ही बीएफएसआयवर वेगाने पुढे जात आहोत. याखेरीज विविध क्षेत्रांमध्ये ग्राहक क्षेत्रात (स्टेपल्स तसेच विवेकाधीन) उत्पन्न कमी होत आहे आणि सेक्टरमध्ये मालकी लक्षणीय प्रमाणात कमी आहे. वीज निर्मिती आणि वीज सुविधांबाबत आम्ही सकारात्मक आहोत. दीर्घावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी रूट वापरणे सुरु ठेवण्याचे सुचवले जात आहे.”
मे २०२४ च्या एएमएफआय माहितीनुसार, मे २०१९ मध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या सरासरी इंडस्ट्री एयुएम १०,६१,६०१ कोटी रुपये होत्या तर मे २०२४ मध्ये त्यामध्ये २३,९१,८५६ कोटी रुपये इतकी वाढ झाली. गेल्या पाच वर्षात १२५% चा परिपूर्ण वृद्धी दर नोंदवला गेला. संपूर्ण भारतभर टाटा ऍसेट मॅनेजमेंटने १०० शाखांचे नेटवर्क उभारले असून १० पेक्षा जास्त शाखा महाराष्ट्रात आहेत.