no images were found
विशेष ज्ञानसत्रांच्या साथीने एचडीएफसी बँकेकडून एसएसएमईंचे सक्षमीकरण
मुंबई : जागतिक एमएसएमई दिनाच्या औचित्याने एचडीएफसी बँक या भारताच्या अग्रगण्य खासगी बँकेने सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना दुर्गम भौगोलिक भागांमध्ये व्यवसाय चालविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एका विशेष मोहिमेचा शुभारंभ केला. एमएसएमईंसाठी उपलब्ध विविध बँकिंग उत्पादने आणि सेवा, सरकारी धोरणे यांच्याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि या उद्योगांनी आपल्या व्यवसायामध्ये डिजिटायझेशनचा स्वीकार करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.
मोहिमेचा भाग म्हणून बँकेकडून खेळत्या भांडवलावरील कर्ज, व्यापारी कर्ज, बिझनेस कार्ड्स, व्यापारी सेवा आणि दुकानदार ओव्हरड्राफ्ट इत्यादी सेवांवर भरपूर ऑफर्स (host of offers) दिल्या जाणार आहेत. याखेरीज बँकेकडून एचडीएफसी स्काय, एचडीएफसी एर्गो, निवा बुपा जनरल इन्श्युरन्स, बजाज अलायन्झ जनरल इन्श्युरन्स आणि आदित्य बिर्ला जनरल इन्श्युरन्स इत्यादींच्या साथीने व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष ज्ञानसत्रांचेही आयोजन केले जाणार आहे. व्यवसायामध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या विषयसूत्राभोवती गुंफलेली ही सत्रे इंदोर, सुरत, रूरकी, नाशिक, लुधियाना, रायपूर, डेहरादून, कोइम्बतूर, वाराणसी, विझग, पटणा, नागपूर, कानपूर, हुबळी आणि गुवाहाटी अशा १५ शहरांमध्ये घेतली जाणार आहे जिथे १,००० लघू आणि मध्यम उद्योगांना आमंत्रित केले जाणार आहे.
यानिमित्ताने बँकेने एचडीएफसी बँकेला आपले बँकिंग पार्टनर म्हणून निवडल्याबद्दल एमएसएमईंचे आभार मानणारी एक खास फिल्मही प्रसिद्ध केली आहे.
एचडीएफसी बँकेच्या कमर्शियल आणि रुरल बँकिंग (CRB)चे प्रमुख श्री. राहुल श्याम शुक्ला म्हणाले, “एमएसएमई उद्योजक आपल्या चिकाटी आणि उद्यमशीलतेने भारताच्या आर्थिक विकासाच्या मार्गाला आकार देण्यामध्ये एक खंबीर भूमिका निभावतात. जीडीपी, निर्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजगारनिर्मितीमधील त्यांच्या योगदानाची एचडीएफसी बँकेला जाणीव आहे. सूक्ष्म उद्योगांचा एक मोठा गट पात्रता असूनही केवळ माहिती उपलब्ध नसल्याने पतपुरवठ्यासाठी अर्ज करत नाहीत. एमएसएमई उद्योगांच्या गरजांची नेमकेपणाने पूर्तता करण्यासाठी आम्ही ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये आपली सेवा पुरवित, विविध सरकारी योजनांविषयी माहिती पोहोचवत आणि फर्मचा आकार, मूल्यवर्धित सेवा, व्यापारी कर्जांची उपलब्धता इत्यादी मूल्यमापनासाठी नेहमी वापरल्या जाणाऱ्या निकषांच्या पार जात त्यांच्या आर्थिक गरजा सातत्याने पुरविण्याचे काम करत आहोत.”
३१ मार्च २०२४ च्या तारखेपर्यंत बँकेच्या वितरण जाळ्यामध्ये ४,०६५ शहरांतील/छोट्या शहरांतील ८,७३८ शाखा आणि २०,९३८ एटीएम्सचा समावेश आहे. यातील एकूण ५२ टक्के शाखा निम-शहरी आणि ग्रामीण भागांत आहेत, ज्याला १५,१८२ व्यापारी प्रतिनिधींची जोड आहे. तसेच त्याला सामायिक सेवा केंद्रांकडून मनुष्यबळ पुरविले जाते.