Home सामाजिक ‘ग्लोबल कॉन्क्लेव्ह ऑन प्लास्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटी’(जीसीपीआरएस) चे दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजन

‘ग्लोबल कॉन्क्लेव्ह ऑन प्लास्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटी’(जीसीपीआरएस) चे दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजन

10 second read
0
0
43

no images were found

ग्लोबल कॉन्क्लेव्ह ऑन प्लास्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटी(जीसीपीआरएस) चे दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजन

 

 

दिल्ली :    ऑल इंडिया प्लास्टिक मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीएमए) आणि द केमिकल्स अँड पेट्रोलकेमिकल्स असोसिएशन (सीपीएमए) यांनी संयुक्तपणे ‘ग्लोबल कॉन्क्लेव्ह ऑन प्लास्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटी (जीसीपीआरएस)चे आयोजन केले असून ही परिषद नवी दिल्ली येथील प्रगती मैदान मधील भारत मंडपम येथे ४ ते ७ जुलै २०२४ दरम्यान पार पडत आहे. या परिषदेमध्ये २०३३ पर्यंत ६.९ बिलियन अमेरिकन डॉलर एवढ्या भव्य गतीने वाढणाऱ्या प्लास्टिक पुनार्वार्पर उद्योगावर तसेच त्यातील प्लास्टिकचा पुनर्वापर आणि त्यासंबंधीतील समस्या यांवरही चर्चा होणार आहे.

केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालयाने या परिषदेला सहकार्य केले आहे. त्यांत भारत सरकारचा रसायन आणि खते विभाग, भारत सरकारची पर्यावरण, वने व पर्यावरणीय बदल,  व्यापार आणि  उद्योग मंत्रालयाचा व्यापार विभाग, गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालय, एमएसएमई मंत्रालय, स्वच्छ भारत अभियान आदी विभाग व मंत्रालयांचा समावेश आहे. या सर्वांनी ‘जीसीपीआरएसला पाठबळ दिले असून भारताच्या निरंतर विकास कार्यक्रमावर त्यातून भर दिला जाणार असल्याचे म्हटले आहे.

जीसीपीआरएसमध्ये भारत आणि जगभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ उपस्थित राहणार आहेत. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि निरंतरता या विषयांवर ही परिषद विविध परिसंवाद आयोजित करणार आहे. या परिषदेमध्ये प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि अधिक निरंतर भविष्याच्या संबंधी करावयाच्या नाविन्यपूर्ण योजना यावरही प्रकाश टाकला जाणार आहे.

भारताचा प्लास्टिक पुनर्वापर उद्योग हा २०३३ पर्यंत ६.९ बिलियन अमेरिकन डॉलर एवढ्या भव्य गतीने वाढणे अपेक्षित आहे. या वृद्धीसाठी सरकारने उचललेली आक्रमक पावले आणि अनौपचारिक क्षेत्राचे तब्बल ६०% पर्यंतचे पुनर्वापर व्यवसायातील योगदान हे य परिषदेमध्ये महत्त्वाचे विषय असणार आहेत.  त्यात निरंतरतेच्या वाढीसाठी करावयाची उपायोजना, प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि पुनर्वापर तंत्रज्ञानामध्ये करावयाच्या सुधारणा यांचा समावेश चार्चार्सात्रांमध्ये असेल.  या माध्यमातून पुनर्वापर क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध होणार असून या परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या विविध घटकांकडून त्यावर विविध उपाय योजनांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला जाणार आहे.

एआयपीएमएच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष श्री अरविंद मेहता यांनी ‘जीसीपीआरएस 2024’चे अध्यक्ष श्री हितेन भेडा आणि ‘एआयपीएमएचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशी मनोज आर शहा यांनी या परिषदेबद्दल संयुक्तपणे माहिती दिली. या तिघांनीही प्लास्टिकचे अधिक चांगल्या पद्धतीने संकलन, विलगीकरण आणि पुनर्वापर या गोष्टींवर या परिषदेमध्ये भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. “या परिषदेमध्ये यांत्रिक, रासायनिक आणि रचनात्मक नाविन्यपूर्णता यावर भर दिला जाणार असून त्या माध्यमातून पुनर्वापराच्या क्षमता स्त्रोतांची कार्यक्षमता आणि मूल्य साखळीच्या सर्व घटकांच्या समायोजनाचा त्यात समावेश असेल,” असेही ते पुढे म्हणाले.

 भारताने शून्य कचरा उद्दिष्ट समोर ठेवले असून ‘जीसीपीआरएसचा भर पुनर्वापराच्या तंत्रज्ञानामधील सुधारणा, जैवअपघटनक्षम (बायोडिग्रेडेबल) आणि विघटनक्षम (कंपोस्टेबल) प्लास्टिक यांसारख्या निरंतर पर्यायांचा विचार आणि कचरा व्यवस्थापन उपाययोजना सक्रियता यावर भर असणार आहे. या आयोजनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील विविध घटक, नवीन कंपन्या आणि पर्यावरणतज्ञ यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांना त्या माध्यमातून त्यांच्या क्षेत्रातील आधुनिक सुधारणा लोकांसमोर आणता येतील, त्याचप्रमाणे प्लास्टिक उद्योगांमध्ये निरंतरता साध्य करण्यासाठी नवीन उपाय सुचवता येतील. या क्षेत्रातील विविध घटक या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकत्र येणार असून त्यात उद्योगातील अधिकारी नाविन्यपूर्ण अंगीकारणारे, धोरण ठरवणारे, तसेच पर्यावरण तज्ञ यांचा समावेश असेल. या व्यासपीठाच्या माध्यमातून व्यावसायिकांना त्यांचे नेटवर्क विस्तीर्ण करणे, नवीन भागीदार शोधणे आणि उभरत्या उद्योग ट्रेंडमध्ये नवीन गोष्टी साध्य करणे शक्य होईल,” असे श्री अरविंद मेहता यांनी म्हटले

 या परिषदेमध्ये प्रदर्शनाबरोबरच ४ जुलै रोजी ‘सीईओची गोलमेज परिषद होणार असून या विषयावरील जागतिक स्तरावरील तज्ञ त्यात आपली मते मांडतील. ५ आणि ६ जुलै रोजी निरंतरता व्यासपीठाच्या झेंड्याखाली या क्षेत्राशी संबंधित अनेक विषय चर्चेला येतील. प्लास्टिक कचऱ्याची इकोसिस्टीम, निरंतरता, पुनर्वापर या गोष्टी या परिषदेत चर्चेला येतील. ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि फार्मास्यूटिकल या क्षेत्रांमध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्वापराचे भविष्य या गोष्टीही चर्चेमध्ये केंद्रस्थानी असतील,” असे श्री हितेन भेडा यांनी म्हटले.  श्री अरविंद मेहता हे ‘अरविंद मेहता टेक्नॉलॉजी अँड एन्टरप्रीनर सेंटर’ अर्थात ‘एएमटीईसीचे अध्यक्ष असून ते पुढे म्हणाले की, “आम्ही भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्लास्टिक मूल्य साखळीमध्ये उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि प्रतिभावान व्यावसायिक घडवत आहोत. त्यामध्ये पुनर्वापरावर सर्वाधिक भर असतो.”

एएमटीईसीची स्थापना प्लास्टिक निर्मिती क्षेत्रातील अतुलनीय अशी कौशल्यपूर्ण मानवी संसाधन पुरवण्यासाठी झाली होती. पुनर्वापर आणि निरंतरता या गोष्टींसाठी कौशल्य विकास घडविण्याच्या कार्यात संस्था कार्यरत आहे.

 या क्षेत्रातील तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, या प्रदर्शनामध्ये प्लास्टिक पुनर्वापर करणारे, मशीन निर्मिती करणारे, प्लास्टिक कचऱ्यावर उपाय देणारे, पुनर्वापर करणारे, व्यापारी बायोपोलिमर आणि कंपोस्टेबल निर्माते, कच्चामाल वितरण नाविन्यपूर्णतेचा ध्यास असलेले स्टार्टअप आणि टेस्टिंग व स्टॅंडर्डायजेशनमधले तज्ञ देशभरातून सहभागी होणार आहेत. ‘जीसीआरपीएसने निरंतरता उपाय आणि नियमन अंमलबजावणी यांच्या प्रतिची सरकारची प्रतिबद्धता आहे त्याचे स्वागत केले आहे. त्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण अशी तंत्रज्ञान समोर येतील, असे तिचे मत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…