Home राजकीय महाराष्ट्राच्या सेवेला, कल्याणाला वाहून घेण्याची राज्यपाल रमेश बैस यांची प्रतिज्ञा

महाराष्ट्राच्या सेवेला, कल्याणाला वाहून घेण्याची राज्यपाल रमेश बैस यांची प्रतिज्ञा

2 second read
0
0
104

no images were found

महाराष्ट्राच्या सेवेला, कल्याणाला वाहून घेण्याची राज्यपाल रमेश बैस यांची प्रतिज्ञा

  मुंबईः महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन,अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आज रमेश बैस यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते.

झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्याच आठवड्यात त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला होता. आज राजभवनात बैस यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडला.

पूर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून महाराष्ट्राविरोधात अनेक अवमानकारक उद्गार काढले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात वक्तव्य केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. राज्यपालांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी राज्यभरात अनेक आंदोलनं करण्यात आली. भगतसिंह कोश्यारी यांचे पुतळेही जाळण्यात आले. केंद्र सरकार राज्यपालांवर कठोर भूमिका घेत नाही, अशी संतप्त टीका करण्यात येत होती. अखेर राज्यपाल कोश्यारी यांनीच राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

राज्यपाल रमेश बैस यांची राजकीय कारकीर्द

रमेश बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला. सध्या रायपूर हे छत्तीसगडमध्ये आहे. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महापालिकेत नगरसेवक पदावर ते निवडून आले. तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर १९८० ते १९८४ या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले. १९८९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले. तिथे रमेश बैस यांनी विजय संपादन केला. त्यानंतर पोलाद आणि खाण राज्यमंत्री, रासायनिक खते राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, खाण मंत्रालय, पर्यावरण आणि वन मंत्रालय, त्रिपुराचे राज्यपाल , झारखंडचे राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…