
no images were found
अंकुर सुपर स्पेशॅलिटी आय हॉस्पिटलचे डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये विलिनीकरण
कोल्हापुर,: महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तसेच कर्नाटकमधील पूर्व भागातील निपाणी आणि बेळगाव शहरांतील अंकुर सुपर स्पेशॅलिटी आय हॉस्पिटल चे डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये विलिनीकरण करण्यात आले असून हे केंद्र आता आय हॉस्पिटल साखळीतील १८४ वी शाखा ठरणार आहे. १९८६ मध्ये डॉ. सदानंद पाटणे, प्रमुख ऑप्थल्मोलॉजिस्ट आणि वैद्यकीय संचालक यांनी स्थापन केलेल्या अंकुर सुपर स्पेशॅलिटी आय हॉस्पिटलद्वारे डोळ्यांशी संबंधित विविध उपचार केले जातात. त्यात कॉर्निया, ग्लुकोमा, रेटिना आणि ऑक्युलोप्लॅस्टि तसेच स्क्विन्ट यांचा समावेश असून देशातील आघाडीच्या डॉक्टर्सद्वारे या सेवा दिल्या जातात.
या विलिनीकरणाविषयी डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. अमर अगरवाल म्हणाले, ‘हे सहकार्य आमच्यासाठी लक्षणीय असून आम्ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात दर्जेदार नेत्रसेवा देण्याचे ध्येय ठेवले आहे. महाराष्ट्रातील आमचा प्रवास २०१७ मध्ये पुण्यात एका केंद्रापासुन सुरू झाला व त्यानंतर २०१९ मध्ये आम्ही मुंबईत सेवा सुरू केली. सध्या राज्यातील विविध ठिकाणी आमची २४ आय केयर हॉस्पिटल्स कार्यरत असून त्यात मुंबई, नाशिक, पुणे व सातारा यांचा समावेश आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘नेत्रसेवा सहजपणे उपलब्ध करून देणे, प्रतीक्षेचा वेळ कमी करणे आणि स्थानिक लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक लाभ करून देणे ही या सहकार्याची उद्दिष्टे आहेत. यापुढे महाराष्ट्रात दीर्घकालीन विस्तार करण्यावर आणि नव्या गरजा ओळखून राज्यातील हॉस्पिटल्सची संख्या ५० वर नेण्याचे आमचे ध्येय आहे.’
अंकुर आय हॉस्पिटलच्या डॉ. सदानंद पाटणे यांना नेत्रसेवा क्षेत्रामध्ये ३८ वर्षांचा अनुभव असून ते दक्षिण महाराष्ट्र, गोवा व उत्तर कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहेत. डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये विलिनीकरणानंतर ते म्हणाले, ‘प्रसिद्ध डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल्स साखळीचा अधिकृतपणे एक भाग होताना मला अभिमान वाटत आहे. तंत्रज्ञानावर आधारित नेत्रसेवा सर्वांसाठी वाजवी दरात उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. या विलिनीकरणातून एकत्रित कौशल्यांसह अंकुर सुपर स्पेशॅलिटीची वैद्यकीय गुणवत्ता तसेच रुग्णांचे समाधान वाढवण्यावर आमचा भर असेल.’