
no images were found
दिल्लीतील निर्भयाकांडापेक्षाही भयानक प्रकार
भंडारा : धक्कादायक आणि अत्यंत चिड आणणारी बातमी. बेघर महिलेवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला. त्यानंतर या पिडित महिलेवर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले. यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात बेघर महिलेवर तीन नराधमांचा पाशवी बलात्कार केला. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. दिल्लीतल्या निर्भयाकांडापेक्षाही भयानक बलात्काराचा प्रकार महाराष्ट्र राज्यात भंडाऱ्यात घडल्याने मोठा धक्का बसला आहे. नागपूर रायपूर महामार्गावर कन्हाडमोह या खेडेगावात रस्त्याशेजारी गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली. या महिलेवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केलाय. एवढंच नाही तर बलात्काकानंतर या महिलेवर धारदार शस्त्राने वारही करण्यात आलेत.
या महिलेच्या गर्भाशयापर्यंतचा भाग अक्षरशः चिरला गेला आहे. तिची स्थिती अतिगंभीर आहे. सुरुवातीला तिला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे. पण अजूनही धोका टळलेला नाही. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवसात तिच्यावर अजून एक शस्त्रक्रिया होणार आहे. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर ही पिडित महिला गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून अजून एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.