Home राष्ट्रीय महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

20 second read
0
0
108

no images were found

महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

कोल्हापूर (प्रतिनिधी):- स्वातंत्र्य दिनाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

            यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या  शुभेच्छा देऊन सर्व विभागातील कर्मचा-यांनी नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचे आवाहन केले. के.एम.टी कडील कर्मचा-यांना 7 वा वेतन आयोग मंजुर झाल्याची माहिती देत त्यांनी ही  कर्मचा-यांना स्वातंत्र्य  दिनाच्या पुर्वसंध्येला मिळालेली विशेष भेट आसल्याचे सांगितले. 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महापालिकेने उल्लेखनीय कामगारी केली असून स्वच्छ सर्व्हेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत 54 व्या क्रमांकावर प्रगती झाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. पुढच्या वर्षी पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

         यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त कपिल जगताप,‍ परितोष कंकाळ, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, वित्त अधिकारी राजश्री पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पवार, महादेव फुलारी, अरुण गुजर,  नगरसचिव सुनिल बिद्रे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कामगार अधिकारी रामचंद्र काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापक राजेश धोंडगे, कर्मचारी संघाचे समुह संघटक संजय भोसले, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…