Home राष्ट्रीय भाजपा जिल्हा कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

भाजपा जिल्हा कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

12 second read
0
0
29

no images were found

भाजपा जिल्हा कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नागळा पार्क येथील जिल्हा कार्यालयात सकाळी ठीक 8 : 30 वाजता कर्नल (निवृत्त) शिवानंद वराडकर व महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यानंतर प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल,श्रीफळ व फुलांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

        सत्कारानंतर बोलताना कर्नल (निवृत्त) शिवानंद वराडकर म्हणाले, आजचा हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून देतो. सीमेवर भारतीय जवान आपली भूमिका सक्षमपणे निभावत आहेत. आपण या देशाचे सुजाण नागरिक म्हणून देशांतर्गत सुरक्षेच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेक विकसित देश आपल्या देशाला स्वावलंबी होण्यापासून अडकाठी करत आहेत. सध्या नव्याने व्यापार युद्ध सुरू झाले आहे. देशात वेगवेगळ्या अफवा पसरून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच सुजान नागरिकांनी काय खरे आणि काय खोटे याची शहानिशा करून सत्याच्या बाजूने, देशाच्या सुरक्षेसाठी एकजुटीने खंबीरपणे पाठीशी राहण्याचे आव्हान त्यांनी केले.यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जिलेबी वितरण करण्यात आली. 

       याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे राजू मोरे अमर साठे विराज चिखलीकर धनश्री तोडकर गायत्री राऊत हेमंत आराध्ये डॉक्टर सदानंद राजवर्धन आप्पा लाड  माधुरी नकाते विश्वजीत पवार सयाजी आळवेकर जयराज निंबाळकर अतुल चव्हाण हेमंत कांदेकर दीपक काटकर मंगला निपाणीकर महेश यादव आजम जमादार अमोल पालोजी रिमा पालनकर दिलीप मैत्राणी सुनील पाटील रवींद्र मुतगी अमये भालकर रवींद्र पवार सचिन पवार विद्या बागडी छाया साळुंखे विशाल शिराळकर एडवोकेट संपतराव पवार अशोक रमचंदानी संजय जासूद संदीप कुंभार दत्ता लोखंडे मानसिंग पाटील रोहित कारंडे डॉक्टर शिवानंद पाटील अनिकेत सोलापूर वेदार्थ राजवर्धन विनय खोपडे रविकिरण गवळी  विवेक वोरा हर्षांक हरळीकर सचिन सुतार सचिन सुराणा दिलीप बोंद्रे प्रणोती पाटील शाहरुख गडवाले तौफिक बागवान यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मध्यपूर्वेतील युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारने हस्तक्षेप करावा !

मध्यपूर्वेतील युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारने हस्तक्षेप करावा ! ‘भाअक’चे रा…