no images were found
अदानीचे सात एअरपोर्ट वर्षभरात झाले मालामाल!
मुंबई -अदानी कंपनीच्या सात विमानतळांनी मार्चअखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात १० लाख मेट्रिक टनांहून अधिक मालाची आवक-जावक केली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ ७ टक्के अधिक आहे, तर देशातील सर्व विमानतळांवरून होणाऱ्या मालवाहतुकीत कंपनीचा वाटा ३० टक्के आहे.
दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता या प्रमुख शहरांत मोठ्या प्रमाणावर मालाची आवक – जावक झाली आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर युएई, नेदरलँडस् आणि अमेरिकेशी मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीचे व्यवहार झाले आहेत. ही मालवाहतूक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई), सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद), चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (लखनौ), तिरूवंनतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोकप्रिय गोपीनाथ बोर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) आणि जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ या सात विमानतळांवरून झाली आहे….या मालाची आवक-जावकअदानी विमानतळांवरून प्रामुख्याने वाहन क्षेत्राशी निगडीत घटक, औषधनिर्मिती कंपन्यांचा माल, नाशिवंत वस्तू, विजेची उपकरणे तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील घटकांचा समावेश आहे.