Home स्पोर्ट्स आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू शैलेश नेर्लीकर स्मृति जलद स्पर्धा

आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू शैलेश नेर्लीकर स्मृति जलद स्पर्धा

0 second read
0
0
26

no images were found

आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू शैलेश नेर्लीकर स्मृति जलद स्पर्धा

कोल्हापूर (प्रतिनिधी):- राम गणेश गडकरी सभागृह,पेटाळा कोल्हापूर येथे,कोल्हापूरचेस अकॅडमीनेे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू शैलेश नेरलीकर स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात प्रारंभ झाल्या. बेळगाव,सातारा,सिंधुदुर्ग, रत्नागिरी चिपळूण, निपाणी, सोलापूर,सांगली जयसिंगपूर,इचलकरंजी व कोल्हापूर येथील नामवंत 191 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.अकरा वर्षाखालील, सतरा र्षाखालील व खुल्या गटात स्वतंत्रपणे या स्पर्धा होत आहेत.स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर अश्विनी माने पाटील व शैलेश नेर्लीकर च्या आई सरला नेर्लीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले
यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारूलकर, आरती मोदी, उत्कर्ष लोमटे, धनंजय इनामदार, बी एस नाईक, रवींद्र निकम, माधव देवस्थळी व सदाभाऊ कदम उपस्थित होते. आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर अकरा वर्षाखालील मुलांचे गटात इचलकरंजीचा विमान सोनी चार पैकी चार घेऊन आघाडीवर आहे, तर 17 वर्षाखालील मुलांचे गटात सांगलीची ईश्वरी जगदाळे व कोल्हापूरचा शंतनू पाटील चार गुणासह आघाडीवर आहे.खुल्या गटात अग्रमानांकित अनिश गांधी कोल्हापूर, श्रीराज भोसले रेंदाळ, आदित्य सावळकर कोल्हापूर, अनिकेत बापट सातारा, विक्रमादित्य चव्हाण सांगली,ओंकार कडव सातारा व मुद्दसर पटेल मिरज, हे सात जण साडेतीन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…