no images were found
संगीत समर्पित मदन कुमार लोहार यांच्या स्मृती कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने जागवल्या सुरसंगीतमय आठवणी
कोल्हापूर(प्रतिनिधी) – अवघे आयुष्य संगीत क्षेत्रासाठी समर्पित केलेल्या आणि कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रात ‘ मदन कुमार आणि पार्टी ‘ या नावाने 1978 पासून वाडी वस्तीपर्यंत संगीत मैफिली केलेल्या संगीतकार संगीत समीक्षक गायक आणि त्याचबरोबर कुशल टू व्हीलर मेकॅनिक म्हणून काम केलेल्या कैलासवासीय मदनकुमार लोहार यांच्या स्मृती त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवांनी पदरमोड करून अक्षरश जागवल्या . शाहू स्मारक भवनात त्यांच्या पत्नी श्रीमती साधना लोहार आणि मित्र परिवारांनी नुकतीच ही मैफिल आयोजित केली होती .सन ऑगस्ट 2021 साली मदन कुमार लोहार यांचे निधन झाले होते मात्र त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी या कार्यक्रमासाठी घेतलेला ध्यास अखेर पूर्णत्वास नेला . त्यांच्याबरोबर वीस वर्षांहून अधिक अनेक संगीत मैफलीत कार्यरत असलेले गायक चंद्रकांत चव्हाण, शशिकांत जाधव ,इकबाल सर्जेखान सह दत्ताराम काशीद गायिका साधना परब , डॉ . प्रिया शहा, जया भट, निता कोळी यांच्या समावेत ही सुरसंगीत मैफिल भावपुर्ण वातावरणात संपन्न झाली .यासाठी प्रकाश साळुंखे यांनी वाद्यवृंदाची जबाबदारी सांभाळली . लोहार परिवाराने आर्थिक भार सहन करून आणि सर्व कलकांनी कोणतेही मानधन न घेता हा सुरसंगीतमय कार्यक्रम पार पडला आणि आपले आयुष्य संगीत क्षेत्रात दिलेल्या मदनकुमार लोहार यांच्या स्मृति यथोचितपणे जागवल्या .कोल्हापूर सह इचलकरंजी हुपरी सांगली ते थेटर कोकणातून अनेक संगीत प्रेमी नागरिक या भावपूर्ण संगीत मैफिलीच्या कार्यक्रमासाठी नवनाथ गर्दी करून उपस्थित होते .