no images were found
कळंबा येथे ‘छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर’संपन्न
कोल्हापूर, : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 10 वी, 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर’ संपन्न झाले.
अमृतसिध्दी मल्टीपर्पज येथे झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्राचार्य महेश एस. आवटे, उपप्राचार्य व्ही. जे. नार्वेकर, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार महावीर बहिरशेट, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक संचालक संगिता खंदारे आदी उपस्थित होते. मेळाव्यास सुमारे 1 हजार उमेदवार व पालक मेळाव्यास उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये डॉ. जॉर्ज क्रूज यांनी 10 वी व 12 वी नंतरचे शिक्षण व करियरबाबत तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अजय मस्के यांनी व्यक्तिमत्व विकास व रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक शितल माळी यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध उद्योगांसाठीच्या कर्ज योजनांची माहिती दिली. जिल्हा कौशल्य विभागामार्फत श्रीमती वाघ यांनी एनसीएस व महास्वयंम पोर्टलवर उमेदवार नोंदणी करणे, उपलब्ध नोकरीच्या संधी बाबत माहिती दिली. उन्मती फाऊंडेशनचे अभिनंदन अंबपकर यांनी नोकरीसाठी उमेदवारांनी प्रोफाईल कसे तयार करावे, याबाबत मार्गदर्शन केले.