no images were found
किर्लोस्कर ऑईल इंजिन्सला ‘नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एनर्जी मॅनेजमेंट अॅण्ड एनर्जी एफिशिएण्ट युनिट २०२२’ पुरस्कार
कोल्हापूर : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडच्या (केओईएल) कोल्हापूर व नाशिक प्लांट्सना वर्ष २०२२ साठी सीआयआयकडून ‘नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एनर्जी मॅनेजमेंट अॅण्ड एनर्जी एफिशिएण्ट युनिट’पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार कंपन्यांना त्यांचे ऊर्जा सानुकूलन, सर्वोत्तम उद्योग पद्धतींचा वापर, ऊर्जेच्या नवीकरणीय स्रोतांचा वापर आणि आत्मनिर्भरतेसाठी दिला जातो.
प्रख्यात मान्यवरांच्या उपस्थितीत किर्लोस्कर ऑईल इंजिन्सला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित प्रख्यात मान्यवर होते- नवी दिल्लीमधील रॉयाल डॅनिश एम्बेसीमधील अॅम्बेसेडर ई. फ्रेडी स्वान, भारत सरकारच्या बीईई, ऊर्जा मंत्रालयाचे सचिव श्री. राकेश के. राय, आयजीबीसी व सीआयआयचे कार्यकारी संचालक श्री. के. एस. वेंकटगिरी आणि सीआयआयचे उप कार्यकारी संचालक श्री. पी. व्ही. किरण अनाथ. युटिलिटीज डिपार्टमेंटचे एजीएम श्री. संतोष परब आणि एनर्जी मॅनेजर श्री. नितीन कुलकर्णी यांनी किर्लोस्कर इंजिन ऑईल्स, कागलच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. तसेच नाशिक प्लांटसाठी श्री. परेश जोशी आणि श्री. हेमंत उपाध्ये यांनी पुरस्कार स्वीकारला.