no images were found
CISFच्या महिला अधिकाऱ्यानं कंगनाच्या कानाखाली मारली.?
मुंबई : अभिनेत्री आणि भाजपची नवी खासदार कंगना रणौतबरोबर चंदीगड विमानतळावर धक्कादायक घटना घडली. चंदीगड विमानतळावर CISFच्या महिला रक्षकानं कंगना रणौतच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. कंगना रणौतनं नुकतीच हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली. कंगना मंडीची खासदार झाली. त्यानंतर विमानतळावर कंगनाबरोबर घटनेनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंदीगड विमानतळावर कंगनाबरोबर घडलेल्या घटनेचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
मंडीतील निवडणूक जिंकल्यानंतर कंगना दिल्लीला निघाली होती. दरम्यान चंदीगड विमानताळावर चेकींग सुरू असताना CISFच्या महिला अधिकाऱ्यानं कंगनाच्या कानाखाली मारली. मारणाऱ्या महिला अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी कंगनानं केली आहे. काही वेळाताच पुढील तपासासाठी CISFच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर CISFच्या वरिष्ठ कमांडंटच्या खोलीत बसून या प्रकरणार वाद झाला आहे. महिला अधिकाऱ्याची इथे चौकशी सुरू आहे.
भाजपकडून कंगनाला उमेदवारी देण्यात आली होती. हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून कंगनानं निवडणूक लढवली. विजय मिळवल्याचा आनंद कंगना साजरा करत होती. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांचे आभार देखील मानले होते. माझं यश हे पंतप्रधान मोदींचं आहे असंही तिनं सांगितलं. दरम्यान “मंडीची खासदार, दिल्ली कॉलिंग, पार्लमेंटच्या दिशेनं” असं म्हणत कंगना दिल्ली पार्लमेंटच्या दिशेनं निघाली होती. चंदीगड विमानतळावर कंगनाबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला.