Home सामाजिक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट रेशो 99.17% 

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट रेशो 99.17% 

1 min read
0
0
18

no images were found

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट रेशो 99.17% 

मुंबई :आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचे क्लेम सेटलमेंट रेशो हे आर्थिक वर्ष 2024 मध्ये 99.17% इतके होते, जे उद्योगातील सर्वोत्तम रेशो पैकी एक आहे. विशेष म्हणजे, वास्तविक डेथ क्लेम सेटलमेंटसाठी सरासरी टर्नअराउंड वेळ फक्त 1.27 दिवसांचा होता. कंपनीने 2024 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी, डेथ क्लेम म्हणून एकूण 1,867 कोटी रुपये दिले.

कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 97.94%, आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 98.14% आणि आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 98.52% होता. यावरून क्लेम सेटलमेंट मध्ये सातत्य दिसून येते.

दावेदार किंवा नॉमिनी व्यक्ति कोणत्याही अडचणी शिवाय क्लेम नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी व्हाट्सएप आणि कंपनीच्या मोबाईल अॅप सारख्या डिजिटल टचपॉईंटचा वापर करू शकतात. तसेच कंपनी क्लेम संबंधित कागदपत्रे घरपोच उपलब्ध करून देते.

श्री अमिश बँकर, चीफ ऑपरेशन ऑफिसर, म्हणाले, “जीवन विमा कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देतो, म्हणून, आम्ही सर्व वास्तविक क्लेम लवकर निकाली काढले जातील याची खात्री करतो. आर्थिक वर्ष 2024 साठी, कंपनीचे उद्योग-अग्रणी क्लेम सेटलमेंट रेशो 99.17% होते आणि सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर तपासणी न केलेल्या रिटेल क्लेमसाठी, डेथ क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा सरासरी वेळ फक्त 1.27 दिवसांचा होता. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दहा वर्षांत कंपनीने लाखो कुटुंबांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करून एकूण 12,112 कोटी रुपये डेथ क्लेम निकाली काढले आहेत.

ते पुढे म्हणाले, कंपनीचा ‘क्लेम फॉर शुअर’ उपक्रम सर्व पात्र डेथ क्लेम सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर एका दिवसात निकाली काढण्याचे वचन देतो. आर्थिक वर्ष 2024 साठी, कंपनीने या उपक्रमांतर्गत एका दिवसात 4,000 हून अधिक क्लेम निकाली काढले आहेत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…