Home राजकीय राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

17 second read
0
0
98

no images were found

राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे.

पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार

पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार आहेत. ठाण्यात ७२ लाख २९ हजार ३३९, नाशिक जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ आणि नागपुरात ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार आहेत.

पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक

रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ३९ हजार ६९७ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७६ आणि महिला मतदार ६ लाख ९३ हजार ५१० आहेत. नंदुरबारमध्ये एकूण मतदार १३ लाख २१ हजार ६४२ असून यामध्ये १३ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ५४ हजार ४१२ आणि महिला मतदार ६ लाख ६७ हजार २१७ आहेत.

गोंदिया जिल्ह्यात एकूण मतदार ११ लाख २५ हजार १०० असून यामध्ये १० तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ५३ हजार ६८५ आणि महिला मतदार ५ लाख ७१ हजार ४०५ आहेत. भंडारा येथे एकूण मतदार १० लाख १६ हजार ८७० असून यामध्ये ४ तृतीयपंथींची नोंद आहे; पुरुष मतदार ५ लाख ६ हजार ९७४ आणि महिला मतदार ५ लाख ९ हजार ८९२ आहेत. सिंधुदुर्गात एकूण मतदार ६ लाख ७८ हजार ९२८ असून यामध्ये ३ तृतीयपंथींची नोंद आहे. पुरुष मतदार ३ लाख ३६ हजार ९९१ आणि महिला मतदार ३ लाख ४१ हजार ९३४ आहेत.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंद आहे ज्यामध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला आणि ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. सोलापूरमध्ये ३८ लाख ४८ हजार ८६९, अहमदनगरमध्ये ३७ लाख ८३ हजार ९८७, जळगावमध्ये ३६ लाख ७८ हजार ११२, कोल्हापूरमध्ये ३३ लाख ५ हजार ९८ आणि औरंगाबादमध्ये ३२ लाख २ हजार ७५१ मतदार आहेत. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या १० जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…