no images were found
बाफ्टा (BAFTA) कडून संपूर्ण भारत, लंडन आणि अमेरिकेतून ब्रेकथ्रू 2024 साठी कलावंतांची घोषणा
नेटफ्लिक्स द्वारे समर्थित ब्रिटीश ॲकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा ) ने आज चित्रपट, टेलिव्हिजन आणि गेम उद्योग गटातून निवडलेल्या नऊ उदयोन्मुख प्रतिभांचे बाफ्टा ब्रेकथ्रू इंडिया 2024 साठी अनावरण केले. या माध्यमातून निवडलेल्या 43 प्रतिभावान व्यक्ती वैश्विक स्तरावर बाफ्टाच्या वतीने आपल्या लंडन आणि अमेरिकेतील यशस्वी सहभागाची सुरुवात करणार आहेत. बाफ्टा ब्रेकथ्रू इंडियासाठी निवडलेल्या नऊ जणांची नावे सृजनशिल क्षेत्रातील प्रमुख तज्ञांच्या प्रतिष्ठित ज्युरीने निश्चित केली. ज्यात प्रमुख ज्युरी सदस्य आणि बाफ्टा ब्रेकथ्रूचे ॲम्बेसेडर गुनीत मोंगा कपूर (निर्माता, संस्थापक आणि सीईओ, सिख्या एंटरटेनमेंट), मानवेंद्र शुकुल (सीईओ, लक्ष्य डिजिटल) यांच्यासह मोनिका शेरगिल (कॉन्टेन्ट उपाध्यक्ष – नेटफ्लिक्स इंडिया), पालोमी घोष (अभिनेता आणि माजी ब्रेकथ्रू इंडिया), राजीव मेनन (चित्रपट निर्माता), रत्ना पाठक शाह (अभिनेत्री, थिएटर डायरेक्टर), संगीता दत्ता (चित्रपट निर्मात्या), शोनाली बोस (चित्रपट निर्माता) आणि सुष्मित घोष (चित्रपट निर्माता) यांचा समावेश आहे.
गेल्या तीन वर्षांच्या काळात नेटफ्लिक्सद्वारे समर्थित बाफ्टा ब्रेकथ्रूने संपूर्ण देशातील चित्रपट, गेम्स आणि टेलिव्हिजन उद्योगांमधील आगामी व्यावसायिकांना शोधून त्यांची यासाठी निवड केली. या माध्यमातून त्यांना त्यांची कौशल्ये सुधारून रुपेरी पडद्यावरच्या जगात त्यांच्या सर्जनशीलतेला आणखी झळाळी मिळावी, यासाठी आवश्यक संसाधने आणि मदत पुरविण्यात आली. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक स्तरावरील सर्जनशील क्षेत्रातील तज्ज्ञ रिची मेहता, सिद्धार्थ रॉय कपूर, फॉबी वॉलर ब्रिज, पॉल लॅव्हर्टी, ग्रॅहम ब्रॉडबेंट यांच्या समुदायाकडून अनमोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावर बाफ्टाच्या मुख्य कार्याकारी अधिकारी जेन मिलिचिप म्हणाल्या, “बाफ्टाने ब्रेकथ्रूसाठी चित्रपट, गेम आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक उदयोन्मुख आणि प्रतिभावान आणि सर्जनशील व्यावसायिकांवर प्रकाशझोत टाकला आहे. ‘मस्ट-वॉच‘ या थिम अंतर्गत 11 व्या वर्षासाठी आमच्याकडे कास्टिंग दिग्दर्शक, निर्माते, लेखक, कलाकार, प्रमुख कलाकार, सिनेमॅटोग्राफर, लीड डेव्हलपरसह अद्भुत दिग्गजांची यादी तयार आहे. बाफ्टाच्या या यशस्वी सहभागासाठी नेटफ्लिक्सचे धन्यवाद द्यायला हवेत. मनोरंजन उद्योगांची याची दख घेण्याचे आवाहन मी करते.
बाफ्टा ब्रेक थ्रू इंडियाचे ब्रॅँड ॲम्बेसेडर आणि ज्युरी अध्यक्ष गुनीत मोंगा कपूर म्हणाले, “भारतात सर्जनशील प्रतिभेची कमतरता नाही, हे यातून पुन्हा एकदा सद्ध झाले आहे. यंदाच्या वर्षी निवडलेल्या नऊ प्रतिभावंतांचे अभिनंदन. प्रतिभावान उमेदवारांची स्क्रुटनी करणे हे आमच्या समोरचे मोठे आव्हान होते. त्यामुळे यंदाच्या ब्रेकथ्रूसाठी निवडलेल्या कलाकारांच्या कलाकृती पाहण्यासाठी मी अतूरतेने प्रतिक्षा करीत आहे