no images were found
गारगोटीतील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु
कोल्हापूर : गारगोटी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अंतर्गत मागास व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींना मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सन 2024-25 मध्ये इयत्ता 8 वी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रवेश दिला जात असून वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी मागास व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, के. डी. देसाई कॉलनी, गारगोटी, ता. भुदरगड जि. कोल्हापूर या वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
वसतिगृहात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थिनींना राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था मोफत केली जाते. तसेच दरमहा 600 रुपये निर्वाहभत्ता, गणवेशभत्ता, स्टेशनरी भत्ता, सहल भत्ता दिला जातो.