Home Uncategorized  सोनी सबच्या कलाकारांनी आपल्या माता-पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली

 सोनी सबच्या कलाकारांनी आपल्या माता-पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली

20 second read
0
0
45

no images were found

 सोनी सबच्या कलाकारांनी आपल्या माता-पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली

 

आपल्या मुलांच्या आयुष्यात माता-पित्याची जी महत्त्वाची भूमिका असते त्याचा गौरव करण्यासाठी जगभरात 1 जून रोजी जागतिक पालक दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस एक मूलभूत आधार प्रणाली म्हणून कुटुंबाच्या महत्त्वावर भर देतो आणिआपल्या मुलांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी पालक जे लक्षणीय योगदान देतात, त्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान या दिवशी करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून सोनी सबवरील कलाकार पडद्यावरील आणि प्रत्यक्षातील माता-पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत आणि त्याच बरोबर पालक असण्यातली आव्हाने काय आहेत याबद्दल आपले अभिप्राय देत आहेत.

सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’मालिकेत जयदेव शर्माची भूमिका करणारा महेश ठाकूर म्हणतो, “माता-पित्यासाठी त्याचे मूल सर्वात सुंदर असते आणि ते त्याच्या माता-पित्याच्या निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक असते. या जागतिक पालक दिनी, आपल्या जीवनावर पालकांचा जो सखोल प्रभाव असतो तो स्वीकारून त्याचा गौरव करतो. माझा मार्गदर्शक प्रकाश बनल्याबद्दल आणि मला निरंतर आधार दिल्याबद्दल मी माझ्या पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मी प्रत्यक्षात आणि पडद्यावर सुद्धा एक पिता असल्याने पालक म्हणून माझ्या कर्तव्यांकडे मी गांभीर्याने पाहतो. ‘आंगन – अपनों का’ मध्ये जयदेवची व्यक्तिरेखा एका जबाबदार पित्याची आहे, जो आपल्या तिन्ही मुलींना सुजाणपण देऊन आपले कर्तव्य चोख बाजावतो.”

 सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पाची भूमिका बजावणारी करुणा पांडे म्हणते, “जागतिक पालक दिनी माझ्या जीवनावर, माझ्या जडणघडणीवर माझ्या माता-पित्याचा किती सखोल प्रभाव आहे, याचा विचार माझ्या मनात येतो. त्यांनी मला जे प्रेम आणि आधार दिला त्याचे प्रतिबिंब मला माझ्या कुत्र्यांशी असलेल्या नात्यात दिसते. ज्याप्रमाणे मी साकारत असलेली पुष्पा आपल्या अश्विन, राशी आणि चिराग या तिन्ही मुलांच्या पाठीशी प्रत्येक चढ-उतारात खंबीर उभी असते, तीच भावना माझी माझ्या पेट्सविषयी असते. पालकत्वामधून तुमच्या निरपेक्ष प्रेमाची साक्ष मिळते, मग ते आपल्या मुलांचे असो किंवा पाळलेल्या प्राण्याबद्दलचे असो.”

 सोनी सबवरील वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से मालिकेत राजेशची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “माझे माता-पिता माझी ताकद आहेत. आपल्या प्रेमाने आणि सामंजस्याने ते माझ्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगात मला मार्गदर्शन देतात. त्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच आज मी आयुष्यात हे यश मिळवू शकलो आहे. माझ्या स्वतःच्या मुलांचाच नाही, तर पडद्यावरच्या मुलांचा देखील चांगला पिता होण्यासाठी माझा नित्य प्रयत्न असतो. पडद्यावर मी सखी आणि अथर्वच्या जसा जवळ आहे, तितकेच माझ्या मुलीशीही माझे नाते खूप निकटचे आहे. एक अभिनेता म्हणून मला ही माझी जबाबदारी वाटते की, अशी व्यक्तिरेखा उभी केली पाहिजे, जी समाजाचे प्रतिबिंब असेल, आणि पालकत्वाच्या बाबतीत विचार केल्यास, राजेश वागले ही अशीच एक जिवंत व्यक्तिरेखा आहे.”

 सोनी सबवरील वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से मालिकेत वंदनाची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “माता पिता हे मुलाच्या आयुष्यातील त्याचे पहिले शिक्षक असतात. माझ्या पालकांनी माझ्या जीवनात कठोर परिश्रम, करुणा आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचे सिंचन केले. त्यांनी माझ्या जीवनात मला नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यांच्या निरंतर प्रोत्साहनाशिवाय एक अभिनेत्री म्हणून ही वाटचाल मी करूच शकले नसते. त्यांनी मला दिलेली मूल्ये माझ्या मुलाला देण्याचा माझा प्रयत्न असतो. माझे माता पिता मला मित्रासारखे आहेत. मी साकारत असलेली वंदना वागले ही व्यक्तिरेखा देखील तशीच आहे. माझ्या पडद्यावरच्या मुलांसाठी मी आई आणि मैत्रीण दोन्ही आहे. ज्याप्रमाणे सखी आणि अथर्व आपल्या आईशी हितगुज करतात, त्याचप्रमाणे माझा मुलगा किशोरावस्थेत येईल, तेव्हा माझ्याशी सर्व काही बोलेल अशी मी आशा करते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…