
no images were found
शुभांगी अत्रे परदेशात भेटली मुलीला!
एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अंगूरी भाबीची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेल्या शुभांगी अत्रेनुकत्याच परदेशात त्यांची मुलगी आशीला भेटल्या. आशी यूएसएमधील सीटल येथे शिक्षण घेत आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत अत्रे यांनी आपल्या मुलीसोबत १२ दिवस उन्हाळी सुट्टीचा आनंद घेतला. शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबीया पुनर्मिलनाबात आपला आनंद लपवू शकल्या नाहीत. त्या म्हणाल्या, ”माझी मुलगी माझ्यापासून दूर परदेशात शिक्षण घेत आहे. म्हणून, मी कामामधून काहीसा ब्रेक घेत माझी मुलगी आशीसोबत खास क्षण व्यतित करण्याचे ठरवले. मी आमच्या भेटण्याबाबत खूप उत्सुक होते. आम्ही एकमेकींना वर्षातून फक्त दोनदा भेटतो, ज्यामुळे तिच्यासोबत वेळ व्यतित करण्याची खूप उत्सुकता असते. सीटलमध्ये विविध ठिकाणी भेट देण्याच्या आणि संस्मरणीय आठवणी तयार करण्याच्या विचाराने मी खूप आनंदित झाले. आम्ही या साहसी प्रवासाचा आनंद घेतला आणि विविध फोटो काढत क्षणांना कॅप्चर केले. आम्हा दोघींना एकत्रित व्यतित करण्याचे क्षण कॅप्चर करायला आवडते. आपल्या दैनंदिन नित्यक्रमामधून अत्यावश्यक ब्रेकमध्ये सीटलमधील उत्साहवर्धक वातावरणाने अधिक उत्साहाची भर केली, तेथील वातावरण उन्हाळ्यादरम्यान मुंबईतील कडाक्याच्या तापमानाच्या तुलनेत अत्यंत आल्हाददायी होते. मला मुंबई व अभिनय खूप आवडतो आणि त्यांच्यापासून दूर असल्यास त्यांची खूप आठवण येते. माझ्या कुटुंबियांसोबत, विशेषत: आशीसोबत वेळ व्यतित करण्याचा क्षण आनंददायी व अद्भुत आहे. या ट्रिपदरम्यान मी आशीची सत्र परीक्षा संपल्यामुळे तिच्यासाठी काही भारतीय मिठाई खरेदी केल्या, ज्यामध्ये दुबईमधील स्वादिष्ट बकलावाचा समावेश होता. आई म्हणून माझी आशीला काही वेळाकरिता भारतात आणण्याची मोठी इच्छा आहे, पण त्याबाबत सध्या योजना आखली जात आहे.”