no images were found
वागले की दुनिया’ मालिकेत आपल्या कुटुंबाला आणि साई दर्शन सोसायटीच्या लोकांना शिस्त लावण्याचा राजेशचा प्रयत्न
सोनी सबवरील वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से या हलक्याफुलक्या मालिकेत वागले कुटुंबाच्या माध्यमातून एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा दैनंदिन संघर्ष दाखवला आहे. अलीकडच्या भागांमध्ये सखी (चिन्मयी साळवी) आणि तिचा मित्र विवान (नमित शाह) मिळून श्रीनिवास वागले (अंजन श्रीवास्तव) आणि राधिका श्रीवास्तव (भारती आचरेकर) यांच्यातील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न करतात. त्यासाठी ते श्रीनिवास वागलेला राधिकाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करायला सांगतात.
आगामी भागांमध्ये, राजेश वागले (सुमित राघवन)ला त्याचा लहानपणीचा मित्र आशीष (अमित पचोरी) भेटतो, जो आता सशस्त्र दलात काम करत आहे. त्याला भेटल्यावर त्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची कडक शिस्त आणि शिष्टाचार पाहून राजेश खूप प्रभावित होतो. राजेशच्या सोसायटीतल्या लोकांनी सुद्धा अशी कडक शिस्त पाळली पाहिजे असे त्यांचे मत असते. राजेश आशीषला स्वतःच्या घरी जेवायला बोलावतो. चिंतित राजेश त्या चांगल्या सवयी आपल्या कुटुंबातील आणि साई दर्शन सोसायटीतील सदस्यांमध्ये देखील रुजवायचा निर्णय घेतो. तो या मंडळींना टेबल मॅनर्स कसे असतात, ते सांगतो पण सोसायटीतील लोकांना त्यात रस नसतो, राजेशचे सांगणे ऐकायला ते तयार होत नाहीत.
राजेशची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “राजेशला त्याचा शाळेचा जुना मित्र भेटतो आणि त्याला भेटल्यावर त्याची शिस्त आणि शिष्टाचार पाहून राजेश खूप प्रभावित होतो. आपल्या घरातल्या आणि सोसायटीतल्या लोकांनी सुद्धा अशी शिस्त आणि शिष्टाचार पाळावेत असे त्याला वाटते. त्याला स्वतःला जीवनातील नियमांचे आणि शिस्तीचे महत्त्व समजले आहे, म्हणूनच तो हा खटाटोप करत आहे. पण जीवनात हे बदल आणल्यामुळे लोकांची चिडचिड होऊ लागते. हे बदल करण्याचा आपला आग्रह का आहे, हे समजावण्याचा राजेश प्रयत्न करतो, पण सोसायटीतील लोक त्यांचे सांगणे मानतील की त्याच्याविरुद्ध उभे राहतील, हे बघणे रोचक असेल.”