Home मनोरंजन निश्चित होणार अटलचा विजय!

निश्चित होणार अटलचा विजय!

2 min read
0
0
26

no images were found

निश्चित होणार अटलचा विजय!

सुशिला बुआ (दीपा सावरगावकर) आणि सुदर्शन त्रिपाठी (माधव अभ्‍यंकर) यांचे अटलविरोधात दुष्‍ट हेतू आगामी एपिसोड्समध्‍ये गोंधळ व नाट्यमय मनोरंजन देणार आहेत. नुकतेच, सुशिला बुआ व सुदर्शन त्रिपाठी यांना अटलविरोधात तिरस्‍कारपूर्ण पराभवाला सामोरे जावे लागले होते, जेथे अटलने त्‍याची आई कृष्‍णा देवीला (नेहा जोशी) धैर्याने पाठिंबा दिला होता. आता या दोघांनी अटलला फसवून चुकीचे ठरवण्‍यासाठी मोठी योजना आखली आहे. कृष्‍णा देवी ऊर्फ नेहा जोशी म्‍हणाल्‍या, “सुशीला बुआ सरस्‍वतीला आश्‍वासन देते की, ती अटल आणि कृष्‍णा देवीला बटेश्‍वरला पाठवेल. ती अवधला मोठ्या भांड्यातील दूध पिण्‍यास समजावते आणि सरस्‍वतीला त्‍याबाबत कृष्‍णा देवीला कळवण्‍यास सांगते. कृष्‍णा देवी अवधला सांगते की, दूध कुटुंबातील सर्वांसोबत शेअर केले पाहिजे. पण, अवध कृष्‍णा देवीकडून दूधाचे भांडे मागतो आणि नकार दिल्‍यानंतर रागाच्‍या भरात दूधाचे भांडे अंगणात फेकून देतो. कृष्‍णा अवधला चुकीच्‍या कृत्‍यासाठी शिक्षा करते, ज्‍यामुळे तो नाराज होतो. ही घटना पाहत असलेला क्रिष्‍णन बिहारी (आशुतोष कुलकर्णी) कुटुंबातील वादामुळे असह्य व अस्‍वस्‍थ वाटते आणि अटलला सर्वांना जेवण्‍यासाठी बोलावण्‍यास सांगतो. प्रथम, अवध अटलची विनंती टाळतो आणि सरस्‍वती त्‍याच्‍या तोंडावर दरवाजा बंद करते. सुशिला बुआ मोठ्या भावाला समजावण्‍यामध्‍ये अयशस्‍वी झाल्‍यामुळे अटलला टोमणा मारते. तरीही, कृष्‍णा देवी अवध लहान असताना त्‍याला दूध देण्‍यासाठी केलेल्‍या मेहनतीबाबत सांगते, अटल अवधला घडलेला प्रसंग सांगतो आणि त्‍याला समजावतो.”  

अटल या समस्‍येचे निराकरण करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतो, पण त्रिपाठी आणि सुशिला बुआ यांची दुष्‍ट योजना नवीन ड्रामा निर्माण करते. कृष्‍णा देवी (नेहा जोशी) पुढे म्‍हणाल्‍या, “सुशिला बुआ सरस्‍वतीला कळवते की, मी अटल शाळेत पोहोचण्‍यापूर्वी बाहेर जाऊन घरी परत येईल. एक कबाडीवाला अटलला त्‍याची शाळेची बॅग देण्‍यास सांगतो. अटलने सुदर्शनला मारण्‍यासाठी लाठी उचलली होती, ज्‍यामुळे सुदर्शन त्रिपाठी देखील त्‍याच्‍या माणसांसोबत येतो आणि अटलला त्‍याची बॅग देण्‍यास सांगतो. सुदर्शन अटलसाठी पुस्‍तकांचा आता काहीच उपयोग नसल्‍यावर भर देतो. सुदर्शन धमकी देखील देतो की, अटल बॅग सोडून गेला नाही तर त्‍याची माणसे ती बॅग हिसकावून घेतील. अखेर तोमर त्‍याच्‍याकडून बॅग हिसकावून घेतो. यामुळे स्‍वत:च्‍या संरक्षणासाठी अटल पुन्‍हा एकदा लाठी उचलतो. पण, सुदर्शन अटलला वचन देतो की त्‍याने लाठी मोडली तर त्‍याची बॅग परत करेल. अटल नकार देतो, कारण त्‍याला शिकवण आठवते की लाठी स्‍वत:च्‍या संरक्षणासाठी आहे आणि मोडता कामा नये. त्‍याऐवजी तो कबाडीवालाकडे त्‍याची बॅग ठेवण्‍यास देतो. कृष्‍णा देवी सुशिला बुआला सकाळी कुठे असल्‍याबाबत प्रश्‍न विचारते, कारण तिला देखील वाटते की सुशिला बुआ देखील सुदर्शनसोबत दुष्‍ट योजना आखण्‍यामध्‍ये सामील आहे. पण, सरस्‍वती तिला पकडले जाण्‍यापासून वाचवते. त्‍याचवेळी, सुशिला बुआ संधीचा फायदा घेत कृष्‍णा देवीला टोमणे मारते आणि म्‍हणते की देव फक्‍त योग्‍य व्‍यक्‍तींनाच पाठिंबा देतो, ज्‍यामधून ती अटलच्‍या मदतीला धावून न गेल्‍याचे दिसून येते. कथानकाला रोमांचक वळण मिळते, जेथे अटलला त्‍याची बॅग परत मिळते आणि तो सुदर्शन व तोमरकडे जाऊन त्‍यांना सांगतो की बॅग/पुस्‍तके व लाठी व्‍यक्‍तीच्‍या व समाजाच्‍या प्रगतीसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…