
no images were found
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा
कोल्हापूर: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता तपोवन मैदान, कळंबा जेल समोर, संभाजीनगर, कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, लोकसभा सदस्य श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, लोकसभा सदस्य धैर्यशिल माने, सर्वश्री आमदार सतेज डी. पाटील, जयंत आसगांवकर, अरुण लाड, विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयश्री जाधव, राजेश पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील, पुणे महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहेत.