Home सामाजिक गोदरेज ऍग्रोवेटने सादर केली नवीन पशु आहार उत्पादने– गोदरेज दौलत आणि गोदरेज धनलक्ष्मी

गोदरेज ऍग्रोवेटने सादर केली नवीन पशु आहार उत्पादने– गोदरेज दौलत आणि गोदरेज धनलक्ष्मी

3 min read
0
0
94

no images were found

गोदरेज ऍग्रोवेटने सादर केली नवीन पशु आहार उत्पादने– गोदरेज दौलत आणि गोदरेज धनलक्ष्मी

 

 कोल्हापूर: भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण कृषी उद्योगांपैकी एक, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडने गोदरेज दौलत आणि गोदरेज धनलक्ष्मीही दोन पशु आहार उत्पादने बाजारपेठेत दाखल केली आहेत.

आधुनिक संशोधन व विकासातून तयार केलेली, विविध फील्डट्रायल्स नंतर सादर करण्यात आलेल्या नवीन कंपाउंड फीड सोल्युशन्समुळे पशूंची उत्पादन क्षमता व पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यात मदत करणारी उत्पादने सादर करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचा नफा देखील वाढेल.

नवीन उत्पादने लॉन्च करण्यात आल्या बद्दल,गोदरेजऍग्रोवेटलिमिटेडचेऍनिमलफीडबिझनेसचेसीईओश्री. संदीपसिंगयांनी सांगितले, “कंपाउंड फीड हे केवळ खाद्य नाही तर भविष्यासाठी गुंतवणूक आहे. पशूंचे आरोग्य चांगले राहावे, दूध उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना लाभदायक दुग्ध शेतीकरता यावी यासाठी गोदरेज दौलत व गोदरेज धनलक्ष्मी सादर करून आम्ही शेतकऱ्यांना असा उपाय उपलब्ध करवून देऊ इच्छितो ज्यामुळे पशूंना सर्वात कमी खाद्य देऊनदे खील सर्वात जास्त दुग्ध उत्पादन मिळवता येऊ शकेल.”

 त्यांनी पुढे सांगितले, “योग्य कंपाउंड फीड निवडून शेतकरी महत्वपूर्ण गुंतवणूक करत आहेत, जी पुढे दीर्घकाळापर्यंत त्यांना उपयोगी ठरणार आहे. आमच्या कंपाउंडफीड सोल्युशन्सच्या मदतीने शेतकऱ्यांना पारंपरिक खाद्य प्रकारांच्या ऐवजी हे प्रगत खाद्य निवडून अतुलनीय यश मिळवता येईल.”गोदरेज दौलत आणि गोदरेज धनलक्ष्मीमध्ये सर्व आवश्यक खनिजे आणि जीवन सत्त्वे असल्यामुळे संतुलित पोषण पुरवले जाते जे पशूंना दिल्या जाणाऱ्या इतर खाद्यांमधून मिळत नाही. पशूंचे एकंदरीत आरोग्य आणि पुनरुत्पादक क्षमता सुधारण्यासाठी एक लिटर दुधासाठी गायींना ३०० ग्रॅम आणि म्हैशींना ५००ग्रॅम गोदरेज दौलत द्यावे असे सुचवण्यात आले आहे. गोदरेज धनलक्ष्मीच्या बाबतीत डोसचे प्रमाण एक लिटर दुधासाठी गायींना ४००ग्रॅम आणि म्हैशींना ५००ग्रॅम इतके असले पाहिजे.

गोदरेज दौलत आणि गोदरेज धनलक्ष्मी हे दोन्ही पाण्यात न भिजवता देता येतात. पण शेतकऱ्यांनी आधीच्या पशु खाद्याचे प्रमाण आठवडा भरात हळूहळू कमी करून त्याऐवजी निवडलेल्या उत्पादन द्यावे. जर शेतकरी गोदरेज धनलक्ष्मी वापरत असतील तर त्यांना आपल्या पशूंना दिवसातून दोनदा हिरवा आणि सुका चारा द्यावा लागेल आणि प्रभावी उत्पादनासाठी पिण्याचे पाणी चोवीस तास उपलब्ध करून द्यावे लागेल.दूध उत्पादनाचा ७०% खर्च हा पशु खाद्यावर अवलंबून असतो, त्यामुळे पशूंच्या अनुवांशिक व पुनरुत्पादक क्षमतेमध्ये वाढ करण्यास मदत करणारे खाद्य वापरले गेले पाहिजेयासाठीच गोदरेजएनिमलफीडपशूंच्या पोषणाची नवी व्याख्या रचत आहे आणि पशूंना खाद्याचे प्रत्येक ग्रामच्या ऐवजी अधिक पोषण प्रदान करून शेतकऱ्यांचे कल्याण करत आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …