
no images were found
सारंग-ऐश्वर्याला शुभेच्छा देत बाईपण भारी देवाच्या टीमने मालिकेच्या शीर्षकगीतावर धरला ठेका
स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या सुरु आहे ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम. हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरु आहे संगीत सोहळ्याची. या खास सोहळ्यासाठी ऋषिकेश, जानकी, सारंग, ऐश्वर्या आणि संपूर्ण कुटुंबासोबतच खास पाहुणेही परफॉर्म करणार आहेत. स्टार प्रवाहच्या परिवारातील सिंधू-राघव, सागर-मुक्तासोबतच महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट बाईपण भारी देवाची टीमही सारंग आणि ऐश्वर्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. बाईपण भारी देवाची टीम घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शीर्षकगीतावर परफॉर्म देखिल करणार आहे. १९ मे ला सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर बाईपण भारी देवा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन होणार आहे. त्यानिमित्ताने या टीमने घरोघरी मातीच्या चुली मालिकेत खास हजेरी लावली. तेव्हा पाहायला विसरु नका घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा संगीत सोहळा विशेष भाग सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.