Home शैक्षणिक “सतेज मॅथ्स” मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटील

“सतेज मॅथ्स” मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटील

30 second read
0
0
70

no images were found

“सतेज मॅथ्स” मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटील

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने आयोजित ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अधिक आवड निर्माण होईल. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होउन बौद्धिक क्षमताही विकसित होतील या माध्यमातून अभियांत्रिकीचा पायाही भक्कम होईल, असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त देवश्री सतेज पाटील यांनी  व्यक्त केला. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. 

      देवश्री पाटील म्हणाल्या, ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ ही परीक्षा विद्यार्थ्यांना गणितासारख्या तांत्रिक विषयात रुची निर्माण करणारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताबाबत सकारात्मक दृष्टीकोन विकसित होईल. त्यामुळे भविष्यातील स्पर्धा परीक्षा आणि अभियांत्रिकी शिक्षणातही याचा नक्कीच चांगला फायदा होईल. या परीक्षेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 

       या परीक्षेत सृष्टी किरापिले व  आकांक्षा तेजम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सार्थक वारके व अर्पिता पाटील यांनी द्वितीय  तर संजीवनी माने व शुभांगी कडोलकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे २५ हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १० हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात आली.

       कार्यकारी संचालक डॉ.ए.के. गुप्ता म्हणाले, गणिताचा वापर केवळ शालेय अभ्यासापुरता मर्यादित नाही. तो दैनंदिन जीवनात व व्यावसायिक क्षेत्रातही तितकाच उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी या विषयाची भीती न बाळगता आत्मविश्वासाने अभ्यास करावा.

       कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सतेज मॅथ्स’ परीक्षा सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून जवळपास 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

      या समारंभास प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख,  प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सौ. वनश्री शिंदे यांनी केले.

     संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील,विश्वस्त ऋतुराज पाटील व विश्वस्त तेजस पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …