Home मनोरंजन  “कुटुंब हा वागले की दुनिया मालिकेचा आत्मा 

 “कुटुंब हा वागले की दुनिया मालिकेचा आत्मा 

6 second read
0
0
41

no images were found

 “कुटुंब हा वागले की दुनिया मालिकेचा आत्मा 

सोनी सबवरील वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से या मालिकेत एकाच छताखाली गुण्या-गोविंदाने नांदणाऱ्या वागले कुटुंबाच्या तीन पिढ्यांचे, त्यांच्या दैनंदिन सुख-दुःखाचे आणि समस्यांचे चित्रण केले आहे. या संयुक्त, मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात परस्परांतील नात्यांचा मान राखला जातो. आजकालच्या गतिशील, आधुनिक जीवनात जेथे विभक्त कुटुंबांचे प्रमाण वाढत चालले आहे, तेथे वागले की दुनिया ही मालिका आजी-आजोबांकडून मिळणारी प्रेमळ शिकवण, भावंडांमधील, चुलत्यांमधील व विविध नात्यांमधील प्रेम, माता-पित्याकडून मिळणारा आधार, एकता आणि एकत्र असण्याची भावना, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची तत्परता वगैरे गुणांची जोपासना करते.

राजेश वागलेची भूमिका साकारत असलेला सुमित राघवन म्हणतो, “आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आपल्याला आपल्या जीवनातील कुटुंबाच्या महत्त्वाचे स्मरण देतो. आनंदाचे क्षण एकमेकांसोबत साजरे करणे असो किंवा संकटांना एकमेकांच्या साथीने सामोरे जाणे असो, आपल्या प्रेमाच्या लोकांची आपल्याला सोबत असणे हे मोठे वरदान आहे. आजच्या गतिशील जीवनात माणूस अधिकाधिक एकटा होत चालला आहे, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये. कुटुंब म्हणजे वागले की दुनिया मालिकेचा आत्मा आहे आणि आम्हाला प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत की, या मालिकेचा त्यांच्यावर कसा सकारात्मक प्रभाव पडला आहे, त्यांना संयुक्त कुटुंबाचे महत्त्व समजू लागले आहे आणि आपल्या माणसांशी संबंध सुधारण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

वंदना वागलेची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “कौटुंबिक जीवनाचे महत्त्व सुंदर पद्धतीने मांडणाऱ्या या मालिकेत वंदना वागलेच्या रूपात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. ‘वागले की दुनिया’मध्ये आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या नात्यांचा, आपला आनंद एकत्र येऊन साजरा करण्याचा, एकमेकांची ताकद बनण्याचा आम्ही गौरव करतो. तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून आम्ही एकत्र काम करत आहोत. त्यामुळे पडद्याच्या मागे देखील आमचे एक कुटुंबच बनले आहे. एकत्र डबा खाण्यापासून ते मधल्या विश्रांतीत एकमेकांशी गप्पा मारण्यापर्यंत आम्ही एका कुटुंबाप्रमाणे सारे काही एकत्र मिळून करतो. आमच्यात एक सुंदर नाते निर्माण झाले आहे. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनी, आपल्या जवळच्या माणसांच्या आसपास असण्यातून जी ऊब आणि आपलेपणाची भावना येते त्या भावनेचा आपण गौरव करू या.”

सखी वागलेची भूमिका करणारी चिन्मयी साळवी म्हणते, “आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा कौटुंबिक नात्यातील सौंदर्य साजरे करण्याचा दिवस आहे. ‘वागले की दुनिया’ मालिकेतील सखी ही व्यक्तिरेखा अचूकपणे दाखवते की, एका संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीला कसे प्रेम मिळते आणि आपल्या माणसांचा आधार मिळतो. कुटुंबातील एकत्र असण्याची भावना, सहानुभूती आणि समजूतदारपणा यावर ही मालिका प्रकाश टाकते. आपल्या जीवनावर कुटुंबाचा किती प्रभाव असतो, त्याचे स्मरण ही मालिका आपल्याला करून देते. आपल्या माणसांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण उपभोगण्याची आणि आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या कौटुंबिक नात्यांना मजबूत करण्याची प्रेरणा ही मालिका देते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…