no images were found
बाफ्टा ब्रेकथ्रूचे भारतात चौथे पुनरागमन
मुंबई : पडद्यावरील कलेसाठीची युके मधील अग्रगण्य चॅरिटी संघटना बाफ्टा नेटफ्लिक्सच्या सहयोगाने भारतामध्ये आपल्या ब्रेकथ्रू प्रोग्रामचे चौथे पर्व घेऊन आली आहे. बाफ्टा ब्रेकथ्रू इंडिया फिल्म्स, गेम्स आणि टेलिव्हिजन उद्योगक्षेत्रामध्ये कार्यरत नव्या पिढीच्या प्रतिभावंत व्यावसायिकांचे कसब ओळखून त्यांचा गौरव करणारा मंच आहे. यावर्षी दुसऱ्यांदा बाफ्टा ब्रेकथ्रू प्रोग्रामने भारत, युएस आणि युके प्रांतांसाठी एकाचवेळी आपली अर्जनोंदणी खुली केली आहे.
बाफ्टा ने आपल्या मार्गदर्शन आणि प्रतिभाशोध कार्यक्रमाच्या माध्यमातून कितीतरी सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रामधील अडथळ्यांवर मात करण्यास मदत करणाऱ्या, त्यांच्या कौशल्यांना अधिक निपुण बनविणाऱ्या आणि त्यांच्या कारकिर्दीला चालना मिळावी अशाप्रकारे त्यांना सहकार्य पुरविणाऱ्या एका सर्वसमावेशी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपापल्या कौशल्याचा पाठपुरावा करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
ही संधी मिळविणाऱ्या ‘ब्रेकथ्रूज’ना या उद्योगक्षेत्रातील धुरिणांबरोबर होणाऱ्या एकास-एक संवादामध्ये तसेच गटचर्चांमध्ये सहभागी होतील. आपले व्यावसायिक आणि निर्मिती कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. बाफ्टा सदस्यत्वाच्या माध्यमातून आपल्या उद्योगक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या जगभरातील व्यक्तींबरोबर संपर्कजाळे बनविण्याच्या संधीबरोबरच या प्रोग्रामच्या कालावधीमध्ये होणाऱ्या म्हणजेच १२ महिन्यांमध्ये बाफ्टा च्या सर्व प्रशिक्षण, विकास आणि नेटवर्किंग उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचीही संधी विजेत्यांना मिळणार आहे.
बाफ्टा चे लर्निंग, इन्क्लुजन, पॉलिसी अँड मेंबरशिपसाठीचे एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर टिम हंटर म्हणाले, “आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, बाफ्टा ब्रेकथ्रू इंडियासाठीची अर्जनोंदणी पुन्हा एकदा खुली झाली आहे. नेटफ्लिक्सकडून मिळालेल्या उदार पाठिंब्यामुळे या उपक्रमातून भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन आणि गेम्स उद्योगक्षेत्रात काम करणाऱ्या असाधारण प्रतिभावंतांच्या एका अख्ख्या फळीची जडणघडण होताना दिसणार आहे आणि या मंडळींनी या वर्षाच्या उत्तरार्धात सुरू होत असलेल्या आमच्या वैश्विक सदस्यत्वधारकांसमोर आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.”