no images were found
जागतिक आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेसाठी निवडझालेल्या खेळाडूंचा कुलगुरूच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी): फ्रान्स येथे होणाऱ्या १० ते १२ जून दरम्यान जागतिक आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धे मधे शिवाजी विद्यापिठाचे ४ महिला खेळाडू आणि १ पुरुष खेळाडूची निवड करण्यात आली आहे. कु कल्याणी कृष्णाथ पाटील, कु वैष्णवी दत्तात्रय पाटील , कु साक्षी धनाजी कुंभार (सर्व न्यू कॉलेज, कोल्हापूर) आकांशा आनंद कातकडे आणि श्री हार्दिक राजेभोसले (एल बी एस कॉलेज सातारा) या सर्वांची अभिनंदनीय निवड भारतीय विठ्यापीठ रग्बी संघामधे केला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय विद्यापीठाच्या एका सांघिक क्रिडा प्रकारमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाचे ४ खेळाडूंचा समावेश झाला आहे. हे खूप अभिनंदनीय आणि कौतुकास्पद बाब ठरली आहे. याचबरोबर कु.शुभांगी बाळू गावडे आणि कु. स्वाती जयाप्पा माळी यांचीही राखीव क्रं १ आणि २ वरती निवड करण्यात आली आहे. अखिलभारतीय आंतरविद्यापीठ आणि खेलो इंडिया या स्पर्धेमधे शिवाजी विद्यापीठाच्या महिला व पुरुष संघाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावून शिवाजी विद्यापीठाचे वर्चस्व अग्रक्रमांकावर कायम ठेवले आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंना विद्यापीठाचे सम्माननीय कुलगुरू प्रा.डॉ.डी टी शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी प्र कुलगुरू ,प्रा.डॉ. पी एस पाटील , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे , संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण प्रा.डॉ. शरद बनसोडे, डॉ पी. टी गायकवाड ,प्रशिक्षक श्री दिपक पाटिल , श्री राहुल लहाने, श्री संग्रामसिंह मोर यांनी शुभेच्या दिल्या .जिल्हा संघटना अध्यक्ष श्री अमर सासणे,श्री अर्जुन पिटुक यांचे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.