no images were found
नवदाम्पत्याने केली नावजीवांची सुरवात पंचगंगेतीतील जलपर्णी काढून..
इचलकरंजी ची जिवनवाहिनी असणारी पंचगंगा नदी ही गेले अनेक दिवस जलपर्णीचा विळख्यात अडकली आहे..
त्यामुळे माणुसकी फौंडेशन ने इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहकार्याने एकच ध्यास जलपर्णीचा ऱ्हास.. व मी उतरणार माझ्या पंचगंगा मातेसाठी मी उतरणार माझ्या उद्याच्या पिढीसाठी… ही संकल्पना घेऊन पंचगंगा नदी केंदाळ मुक्त करण्याचा निश्चय केला. व त्याप्रमाणे गेले 60 पेक्षा जास्त दिवस माणुसकी फौंडेशन ची टिम माणुसकी फौंडेशन चे संस्थापक श्री.रवि जावळे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी महापालिकेच्या सकऱ्याने पंचगंगा केंदाळ मुक्ती साठी झटत आहेत.याच दरम्यान माणुसकी फौंडेशन चे सदस्य श्री.कृष्णा इंगळे यांचा विवाह निश्चित झाला..13 जून2023 रोजी विवाह असल्यामुळे विधीसाठी 10 जून पासूनच श्री.कृष्णा यांना केंदाळमुक्ती च्या मोहिमेसाठी जाता आले नाही..पण पूर्ण आपली पंचगंगा पूर्ण केंदाळमुक्त झाली नाही व 3 दिवस आपल्याला जात आले नाही याची हुरहुर श्री.कृष्णा यांच्या मनाला लागून राहिली होती.
व त्यावेळीच त्यांनी मनात निश्चित केले की लग्न झाल्या झाल्या सर्वप्रथम पंचगंगा नदीवर जाऊन खारीचा वाटा म्हणून आपल्या नववधूसह शक्य होईल तेव्हडे केंदाळ काढायचच..त्यामुळे मंगळवारी त्यांचा 13 जून रोजी विवाह संपन्न झाल्या झाल्या लगेच सर्वप्रथम श्री.वरदविनायक गणपती मंदिर येथे श्री.गणरायाचं आशिर्वाद घेतल्यावर आपल्या नववधूला हा आपला मानस त्यांनी सांगितला.व नववधू सौ.शिवानी यांनीदेखील कोणतेही आढेवेढे न घेतला आपल्या साथीदाराला साथ देण्याचा निर्णय घेतला..आणि त्यानुसार दोघेही काल पंचगंगा नदीपात्र येथे येऊन जलपर्णी काढली..श्री.कृष्णा व सौ.शिवानी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.