no images were found
मदर्स डेः झी टीव्हीवरील कलाकारांनी दिले आपापल्या आईसाठी गोड संदेश
‘मदर्स डे’ हा एका आईचे आपल्या मुलांवर असलेले अनंत प्रेम आणि त्यांच्यासाठी ती पदोपदी करत असलेला त्याग यांची दखल घेतो. हा दिवस लोकांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा असून आपल्या आईच्या अथक समर्पण आणि काळजीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक सुयोग्य दिवस आहे. हा दिवस केवळ सेलिब्रेशनचा नसून आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी आई निभावत असलेल्या असमांतर भूमिकेची दखल घेण्याचा हा दिवस आहे. ह्या दिवशी आपल्या आईसाठी काहीतरी खास करून, तिला आनंद वाटेल असे काहीतरी विशेष करून हा दिवस आपल्याला आपल्या आईच्या सहवासाचा आनंद घेण्याची आठवण करतो आणि प्रत्येक आईचा सन्मान करतो. ह्या विशेष दिनानिमित्त झी टीव्हीवरील कलाकार – ‘कुमकुम भाग्य’मधील राची शर्मा, ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’मधील निक्की शर्मा, ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मधील मनित जौरा, ‘रब से है दुआ’मधील सीरत कपूर, ‘भाग्यलक्ष्मी’मधील ऐश्वर्या खरे, ‘कुंडली भाग्य’मधील बसीर अली, ‘कैसे मुझे तुम मिल गये’मधील हेमांगी कवि आणि ‘मैं हूँ साथ तेरे’मधील उल्का गुप्ता यांनी आपल्या आईवरील आपले प्रेम व्यक्त करताना हा दिवस ते तिच्यासोबत कसा साजरा करणार आहेत याबद्दल सांगितले.
झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’मध्ये लक्ष्मीच्या भूमिकेतील ऐश्वर्या खरे म्हणाली, “कुठलीही परिस्थिती असली तरी माझी आई माझी सुपरहिरो आहे. मी जेव्हा कधी कुठल्या परिस्थितीत अडकते तेव्हा नेहमी तिचाच सल्ला मला हवा असतो. घरातील मी सर्वांत मोठी मुलगी असल्यामुळे मी माझ्या आईच्या अतिशय जवळ राहिले आहे. मी तिच्यापासून कधीच कुठलीही गुपिते दडवत नाही. आजही जेव्हा मला बरं नसतं किंवा कुठल्या गोष्टीचा तणाव असतो तेव्हा माझ्या आईला मी एक फोन करते आणि ती माझ्या सगळ्या समस्या दूर करते. सगळ्या आईंना हॅपी मदर्स डे.”
झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’मध्ये शक्तीच्या भूमिकेतील निक्की शर्मा म्हणाली, “प्रत्येक आई परिवाराचा एक भक्कम आधारस्तंभ असतो आणि अगदी तशीच माझी आई आहे. माझे तिचे काय नाते आहे ते मी शब्दांत मांडू शकणार नाही. ती माझी केवळ आई नाही तर माझी खास दोस्त, थेरेपिस्ट, ट्रॅव्हल पार्टनर आणि कॉन्फिडांटही आहे, जिला मी जे काही असेल ते सांगू शकते. हा दिवस साजरा करण्यासाठी मी माझ्या आईसोबत खास आई–मुलीची डिनर डेटचे प्लॅनिंग केले असून त्यानंतर मी तिला शॉपिंगलाही घेऊन जाणार आहे, म्हणजे जगातील सर्वोत्तम आई असल्याबद्दल आणखी खास वाटेल.”
झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’मध्ये पूर्वीच्या भूमिकेतील राची शर्मा म्हणाली, “मला वाटतं मी माझ्या आईबद्दल जेवढं काही बोलेन ते कमीच असेल. मदर्स डे च्या दिवशी माझी आई माझ्या आयुष्यात असणे मी सेलिब्रेट करत आहे कारण तिच्याशिवाय मी काहीच नाही. माझ्या आयुष्यात तिनेच मला सहकार्य दिले आणि प्रेरित केले आहे. ती नेहमीच माझ्यासाठी एका आधारस्तंभासारखी उभी असून मी माझी क्षमता ओळखावी म्हणून तिने मला प्रोत्साहन दिले. मी मुंबईमध्ये असल्यामुळे आणि ती इंदौरला आमच्या घरी असल्यामुळे मी मदर्स डे च्या निमित्ताने तिला एक सुंदर साडी आणि फुले पाठवीन. ह्या मदर्स डे च्या निमित्ताने मला माझ्या आईला सांगायचंय आय लव्ह यू मॉम, तू माझे विश्व आहे आणि माझ्यासाठी नेहमीच असल्याबद्दल तुझे मनापासून आभार.”
झी टीव्हीवरील ‘रब से है दुआ’मध्ये मन्नतच्या भूमिकेतील सीरत कपूर म्हणाली, “प्रत्येकच बाळासाठी त्यांची आईच पहिली शिक्षिका असते. पहिला शब्द बोलण्यापासून संपूर्ण वाक्य बोलण्यापर्यंत आईच आपल्या बाळांना शिकवत असते. माझ्यासाठी माझी केवळ माझी खास दोस्त नसून एक अशी व्यक्ती आहे जिच्यावर मी सर्वांत जास्त भरवसा करते. तिला मी माझ्या सर्व गोष्टी सांगते आणि तीच माझी सगळ्यात मोठी समर्थक आहे. मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की आपल्या आईचे ऋणी राहा आणि हा मदर्स डे तिच्यासाठी एक्स्ट्रा खास बनवा.”
झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मधील युगच्या भूमिकेतील मनित जौरा म्हणाला, “मी माझ्या मनातले विचार व्यक्त करण्यामध्ये विश्वास ठेवतो, त्यामुळे जे लोक माझ्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत आणि महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत त्यांना ते तसे सांगण्यापासून मी कचरत नाही. माझ्या आईच्या बाबतीत तर ह्या गोष्टीला काही मर्यादाच नाहीये. माझी आई माझी खास दोस्तच नव्हे तर माझा आधार आहे. त्यामुळे ह्या खास दिवशी आणि दररोज मी तिच्यासोबत हा खास दिवस साजरा करत आहे, सगळ्याच आईंना हॅपी मदर्स डे.”
झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’मधील शौर्यच्या भूमिकेतील बसीर अली म्हणाला, “मी माझ्या आईला मदर्स डे च्या निमित्ताने सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त हेल्दी मील पाठवणार आहे. दिवसभरात तिच्यासाठी सुंदर फुले आणि केकही पोहोचवला जाईल. माझ्या मते आई हा एक आशीर्वादच आहे. त्या अगदी निःस्वार्थी असतात आणि आपल्या मुलांसाठी त्याग करतात आणि अन्य कोणीही करू शकणार नाहीत अशा प्रकारे आपल्या बाळांचे संगोपन करतात, आई ही परमेश्वराची देणगी आहे आणि आपण आपल्या आयुष्यात त्यांच्यासोबत प्रत्येकच दिवस साजरा करायला हवा.”
झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गये’ मध्ये भवानीच्या भूमिकेतील हेमांगी कवि म्हणाली, “आपले सर्वांचे विभिन्न विश्वास असतात, आणि माझ्यासाठी माझी आई नेहमीच माझ्यासाठी एक मार्गदर्शक प्रकाशाच्या रूपात राहिलेली आहे. तिला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तपशिलवार ठाऊक असून ती कायम माझ्यासाठी हजर आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहे. आमचे अगदी टिपीकल आई मुलीचे नाते आहे, प्रेम, आदर आणि काहीवेळा वादविवादांनी भरलेले. पण आमच्या मनात खोलवर एकमेकींसाठी फक्त प्रेम आहे. आयुष्यातील आव्हानांमध्ये माझी आई शक्ती आणि चिवटपणा यांचे प्रतीक बनून माझ्यासमोर उभी असते.
झी टीव्हीवरील ‘मैं हूँ साथ तेरे’ मध्ये जान्वीची भूमिका निभावणारी उल्का गुप्ता म्हणाली, “मदर्स डे च्या दिवशी माझ्या आईबद्दल माझ्या मनात केवळ कृतज्ञतेची भावना आहे. मी आज जे काही आहे ते मला माझ्या आईनेच बनवले आहे. ती माझी सपोर्ट सिस्टम आहे. ती माझ्यासाठी आशेचा किरण आहे. मी आयुष्यात जे काही कमावलं आहे आणि जे काही यश मिळवलं आहे ते केवळ तिचा माझ्यावर असलेल्या विश्वासामुळेच झाले आहे. ती माझ्यासाठी मार्गदर्शक प्रकाश असून माझ्या शक्तीचा अविरत स्त्रोत आहे.