
no images were found
मसुद माले येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरु
कोल्हापूर, : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, मसुद माले, ता. पन्हाळा येथे शैक्षणिक सत्र 2024-25 साठी नवीन प्रवेश सुरु झाल्याचे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले यांनी कळविले आहे
इयत्ता 6 वी ते 10 साठी एस.सी., एस.टी., व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी 9922411885 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.