no images were found
जिल्ह्यात कलम 144 अन्वये मतदान संपेपर्यंत सार्वजनिक सभा, बैठका घेण्यास प्रतिबंध – अमोल येडगे
कोल्हापूर, : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील 47- कोल्हापूर व 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही अगर सभा घेता येणार नाही. त्यासाठी जिल्ह्यातील 47- कोल्हापूर लोकसभा मतदार संघ व 48- हातकणंगले लोकसभा मतदार संघ कार्यक्षेत्रात दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्या पासून ते मतदान दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी प्रतिबंध करण्याचे आदेश जारी केले आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील 47- लोकसभा मतदार संघ व 48 -हातकणंगले मतदार संघाचे कार्यक्षेत्रात मतदानाचे दोन दिवस अगोदर म्हणजे दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते मतदान दिवशी म्हणजे दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालील कृती करण्यास मनाई करीत आहे.
बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे. तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई. (पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून व भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून) वरील आदेश मतदानाकरीता घरोघरी जावून भेटी देण्यासाठी लागू राहणार नाही. या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.