Home सामाजिक कुशक आणि स्‍लाव्हिया मॉडल ईयर २४ अपडेट्ससह बनल्‍या अधिक सुरक्षित

कुशक आणि स्‍लाव्हिया मॉडल ईयर २४ अपडेट्ससह बनल्‍या अधिक सुरक्षित

3 min read
0
0
30

no images were found

कुशक आणि स्‍लाव्हिया मॉडल ईयर २४ अपडेट्ससह बनल्‍या अधिक सुरक्षित

 

ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये कुशक एसयूव्‍ही आणि एप्रिल २०२३ मध्‍ये स्‍लाव्हिया सेदानसह सुरक्षितता बेंचमार्क्‍स स्‍थापित केल्‍यानंतर स्‍कोडा ऑटो इंडियाने कुशक व स्‍लाव्हियाच्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून सहा एअरबॅग्‍ज सादर करत सुरक्षिततेमध्‍ये वाढ करणे सुरू ठेवले आहे. हे सादरीकरण कंपनीच्‍या उल्‍लेखनीय मेड-फॉर-इंडिया, रेडी-फॉर-द-वर्ल्‍ड इंडिया २.० प्रॉडक्‍ट पोर्टफोलिओसाठी त्‍यांच्‍या मॉडल ईयर २४ (माय २४) अपडेट्सचा भाग आहे.

या अपग्रेड्सबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्‍हणाले, आम्‍ही नेहमी आमच्‍या बेस व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये फ्रण्‍ट एअरबॅग्‍ज आणि आमच्‍या उच्‍च व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सहा एअरबॅग्‍ज ऑफर केल्‍या आहेत, ज्‍यामधून इतरांच्‍या तुलनेत अधिक सुरक्षितता दिसून येते. आमच्‍या मॉडल ईयर २४ अपडेट्सचा भाग म्‍हणून आम्‍ही आता कुशक आणि स्‍लाव्हियाच्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सहा एअरबॅग्‍ज ऑफर करत आहोत. आम्‍ही नेहमी आमच्‍या ग्राहकांच्‍या अभिप्रायांना प्राधान्‍य दिले आहे आणि आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओ व व्‍हेरिएण्‍ट लाइन-अपमध्‍ये संबंधित अपडेट्स व मोठ्या प्रमाणात उत्‍पादन सुधारणा करत राहू.”

सातत्‍यपूर्ण अपडेट्स

कुशक व स्‍लाव्हियाच्‍या मॉडल ईयर २४ श्रेणीमधील सुधारणा कंपनीने २०२३च्‍या चौथ्‍या तिमाहीमध्‍ये सादर केलेल्‍या अपडेट्समधील अधिक भर आहेत. या कालावधीदरम्‍यान दोन्‍ही कार्सच्‍या टॉप-ऑफ-द-लाइन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये नवीन वैशिष्‍ट्ये सादर करण्‍यात आले, जसे ड्रायव्‍हर व को-ड्रायव्‍हरसाठी इलेक्ट्रिक सीट्स, जे सेगमेंट-फर्स्‍ट आहे आणि प्रकाशित फूटवेल क्षेत्र. डॅशच्‍या मध्‍यभागी २५.४ सेमी इन्‍फोटेन्‍मेंट स्क्रिनसह स्‍कोडा प्‍ले अॅप्‍स होते. सिस्‍टम वायरलेस्‍लीला अॅप्‍पल कारप्‍ले आणि अँड्रॉईड ऑटोशी लिंक होते. ही फुल-फ्लेज इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम स्‍टाइल आणि इतर व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असण्‍यासह नवीन अपडेट्सच्‍या माध्‍यमातून कंपनीने मिड-लेव्‍हल अॅम्बिशन ट्रिम्‍समध्‍ये देखील सादर केली आहे, ज्‍यामुळे ग्राहकांसाठी मूल्‍य तत्त्वामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे.

हे अपग्रेड्स स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या २०२४ प्रॉडक्‍ट अॅक्‍शन्‍समध्‍ये अधिक वाढ करतात, जेथे ऑल-न्‍यू कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही २०२५ मध्‍ये भारतात जागतिक पदार्पण करण्‍याची, तसेच चाहते व ग्राहकांमधील लक्‍झरी सेदानप्रती सतत होणाऱ्या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी मर्यादित आकडेवारीमध्‍ये सुपर्ब पुन्‍हा लाँच करण्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…