
no images were found
प्रज्ञाशोध परीक्षा मधील यशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ संपन्न
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आज संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे शासकीय महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा मधील राज्यस्तर, जिल्हास्तर मध्ये दैदिप्यमान कामगिरी केलेले विद्यार्थी, महापालिका छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती परीक्षा, कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा मधील यशवंत ९१४ विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार ट्रॉफी व मेडल देवून करण्यात आला. तसेच ७२ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सन २०२३-२४ मधील सर्वसाधारण विजेता पदाची आकर्षक ट्रॉफी मनपा लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेस प्रदान करण्यात आली.
यावेळी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उपायुक्त साधना पाटील, प्रशासनाधिकारी शंकर यादव, जेष्ठ साहित्यिक डॉ. जी. पी. माळी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, मनपा शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, विलास पिंगळे, राजेंद्र पाटील, दिलीप माने, डी. मार्ट सी.एस.आर. चे लक्ष्मण यादव यांचे हस्ते यशवंत ९१४ विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अजय गोसावी, अविनाश लाड, शांताराम सुतार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी केले. या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे नियोजन प्र.कनिष्ठ लिपिक संजय शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन आर.जी. किर्तीकर, सारिका पाटील, मनीषा पांचाळ यांनी केले. उपस्थितांचे आभार शैक्षणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांनी मानले. यावेळी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांचे लिखित अक्षरब्रम्ह या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तर पुस्तकाचे परिचय सहाय्यक शिक्षक सुधाकर सावंत यांनी केले.