Home सामाजिक एनएसई निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सवर (NIFTYNXT50)  डेरिव्हेटिव्ह्ज लाँच करणार

एनएसई निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सवर (NIFTYNXT50)  डेरिव्हेटिव्ह्ज लाँच करणार

18 second read
0
0
34

no images were found

एनएसई निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सवर (NIFTYNXT50)  डेरिव्हेटिव्ह्ज लाँच करणार

 

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) या ट्रेड झालेल्या कॉन्ट्रॅक्ट्सच्या बाबतीत वर्ष २०२३ मधील जगातील पहिल्या क्रमांकाच्या डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंजला निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सवर (NIFTYNXT50) डेरिव्हेटिव्ह्जसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (सेबी) मान्यता मिळाली आहे. त्यानुसार २४ एप्रिल २०२४ रोजी हे कॉन्ट्रॅक्ट्स लाँच केली जाणार आहेत.एक्सचेंजद्वारे ३ सीरियल मासिक इंडेक्स फ्युचर्स आणि इंडेक्स ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट सायकल उपलब्ध केली जाणार आहेत. कॅश सेटल्ड डेरिव्हेटिव्ह्ज कॉन्ट्रॅक्ट्स अखेरच्या मुदतीच्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी एक्सपायर होतील.

निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स निफ्टी १०० वरील ५० कंपन्यांचे प्रतिनिधीत्व असून त्यामध्ये निफ्टी ५० कंपन्यांचा समावेश होत नाही. मार्च २०२४ मध्ये इंडेक्सने आर्थिक सेवा क्षेत्राचे २३.७६ टक्क्यांसह टॉप सेक्टर प्रतिनिधीत्व केले असून त्यापाठोपाठ कॅपिटल गुड्स क्षेत्र ११.९१ टक्के आणि ग्राहक सेवा क्षेत्र ११.५७ टक्क्यांवर आहे. १ जानेवारी १९९७ रोजी सुरू करण्यात आलेल्या या इंडेक्सची बेस तारीख आणि बेस मूल्य अनुक्रमे ३ नोव्हेंबर १९९६ आणि १००० आहे. इतक्या वर्षांत इंडेक्स पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. इंडेक्स कम्प्युटेशन मेथडॉलॉजीचे ४ मे २००९ पासून फ्री प्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड मेथडमध्ये रुपांतर करण्यात आले. त्याशिवाय कॉन्स्टिट्यूअंट्स स्टॉक्ससाठी वेट कॅपिंग सुरू करण्यात आले, ज्यावर डेरिव्हेटिव्ह्ज उपलब्ध नव्हते. २०२३ मध्ये त्यात नॉन- एफ अँड ओ स्टॉक्सच्या एकत्रित १० टक्के वेट्सचे कॅपिंग करण्यात आले आणि इंडेक्सवरील नॉन- एफ अँड ओ स्टॉक्स वैयक्तिकपणे तिमाही रिबॅलन्स चारखांना ४.५ टक्क्यांवर कॅप करण्यात आले.

इंडेक्स कॉन्सिट्यूअंट्सचे बाजार भांडवल ७० ट्रिलियन रुपये असून ते २९ मार्च २०२४ रोजी पर्यंत एनएसईवर नोंदणीकृत असलेल्या स्टॉक्सच्या एकूण बाजार भांडवलाच्या १८ टक्क्यांचे प्रतिनिधीत्व करते. इंडेक्स कॉन्स्टिट्यूअंट्सची दैनंदिन सरासरी उलाढाल ९५६० कोटी रुपये असून आर्थिक वर्ष २४ मधे रोख बाजारपेठ उलाढालीतील त्याचा वाटा १२ टक्के आहे.निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सचे कोरिलेशन ७१ टक्के आणि बीटा मूल्य ०.९५ निफ्टी ५० इंडेक्ससह आहे. त्याचे निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्ससह आर्थिक वर्ष २०२४ मधील कोरिलेशन ९० टक्के आहे.

गेल्या काही वर्षांत एक्सचेंजने जानेवारी २०२२ मध्ये निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स (MIDCPNIFTY) आणि जानेवारी २०२० मध्ये निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस इंडेक्स (FINNIFTY) इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज विभागात लाँच केले होते. त्याशिवाय कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह्ज विभागात विविध उत्पादने लाँच करण्यात आली होती. MIDCPNIFTY डेरिव्हेटिव्ह्ज फ्युचर्स उलाढाल सर्वोच्च २८८८ कोटी रुपयांवर पोहोचली होती. १६.७ कोटी ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड करण्यात आले आणि ऑप्शन प्रीमियम उलाढाल रू. १७,२८३ कोटी रुपयांवर गेली. FINNIFTY डेरिव्हेटिव्हज १२८८ कोटी रुपयांच्या सर्वोच्च फ्युचर उलाढालीवर गेले होते. ३८.२ कोटी ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड करण्यात आले. ऑप्शन प्रीमियम लाढाल रू. ३२,९९४ कोटी रुपयांवर गेली. कमॉडिटी डेरिव्हेटिव्हज क्षेत्रात डब्ल्यूटीआय क्रुड ऑइल फ्युचर्स ऑप्शनमध्ये सर्वोच्च १,०२, ३०४ कॉन्ट्रॅक्ट्स पाहायला मिळाली.

एनएसईचे प्रमुख व्यवसाय विकास अधिकारी श्री. श्रीराम कृष्णन म्हणाले, ‘निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स (NIFTYNXT50) वर डेरिव्हेटिव्हज उपलब्ध झाल्याने ते सद्य इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्ज उत्पादन श्रेणीला पूरक ठरेल. निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स आघाडीच्या आणि लिक्विड स्टॉक्सचा समावेश असलेला निफ्टी ५० इंडेक्स आणि आघाडीच्या लार्ज आणि लिक्विड मिड कॅपिटलाइज्ड स्टॉक्समधील निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स यांच्यातील जागेचे प्रतिनिधीत्व करेल.   ’

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …