Home आरोग्य मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने  #InhaleTheChange मोहीम सुरू केली,

मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने  #InhaleTheChange मोहीम सुरू केली,

18 second read
0
0
23

no images were found

मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने  #InhaleTheChange मोहीम सुरू केली,

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या साथीने सिप्लाने #InhaleTheChange नावाचा देशव्यापी जनजागृती उपक्रम सुरू केला असून, इन्सुलिन थेरपीशी संबंधित भावनिक आणि वर्तणुकीतील अडथळ्यांवर मात करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  भारतासमोरील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हानांमध्ये मधुमेहाची गणना केली जाते, मधुमेहामुळे दीर्घकालीन आजारपण आणि लक्षणीय जीवितहानी याचा सामना करावा लागतो. 10 कोटींहून अधिक भारतीय या आजाराने ग्रस्त असल्याने देशाला अनेकदा ‘जगाची मधुमेह राजधानी’ म्हटले जाते, अशा परिस्थितीत, केवळ 27.5% लोकांना त्यांच्या स्थितीची जाणीव आहे आणि फक्त 7% लोकांची रक्तातील साखर नियंत्रणात आहे, ही बाब खरोखरच चिंताजनक आहे [1], [2] या आकड्यांमुळे वैद्यकीय आव्हानांचा खडतर मार्ग तर दिसून येतोच पण त्याचसोबत भीती, सामाजिक लांच्छन किंवा आपल्या स्थितीबद्दल आणि उपलब्ध पर्यायांबद्दलच्या माहितीच्या अभावामुळे उपचारांमध्ये चालढकल करणाऱ्या किंवा उपचार बंद करणाऱ्या रुग्णांच्या दैनंदिन संघर्षांवरही प्रकाश टाकतात.

       या वास्तविक जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्याची गरज अधोरेखित करताना, डॉ. शर्विल सुरेश गाडवे, एंडोक्राइनोलॉजिस्ट, म्हणाले:“टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी इन्सुलिन आवश्यक असते आणि टाइप 2 मधुमेहाच्या अनेक रुग्णांसाठी तो एक महत्त्वपूर्ण उपचार ठरतो. असे असले तरी, इंजेक्शनची भीती,  क्लिष्ट दिनचर्या आणि सामाजिक  गैरसोय यांसारखे दैनंदिन अडथळे यामुळे अनेकदा रुग्ण उपचार सुरू करण्यापासून किंवा ते नियमितपणे घेण्यापासून परावृत्त होतात. 5 नवीन इन्सुलिन वितरण पर्याय व्यावहारिक उपाय देत असले तरी, या प्रगतीला रुग्ण-केंद्रित संवाद आणि समर्थनाची जोड दिल्यासच खरा फरक पडतो. #InhaleTheChange सारख्या मोहिमांमुळे खुल्या संवादासाठी जागा निर्माण होते, ज्यामुळे रुग्णांना त्यांचे म्हणणे ऐकले जात आहे, त्यांना माहिती मिळत आहे आणि ते सक्षम होत आहेत असे वाटते.”

       टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांसाठी आणि टाइप 2  मधुमेह असलेल्या अनेकांसाठीच्या मधुमेह व्यवस्थापनामध्ये इन्सुलिन हा सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक आहे.  असे असूनही, उपचारांमध्ये सातत्य राखणे आव्हानात्मक असू शकते, आणि याचे कारण जागरूकता किंवा हेतूचा अभाव नसून, दैनंदिन व्यवस्थापनामुळे येणारा भावनिक आणि व्यावहारिक ताण हे खरे कारण आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भीती, तणाव, विसरभोळेपणा, गोंधळ आणि दैनंदिन दिनचर्या किंवा गोपनीयतेशी संबंधित अडचणींमुळे अनेकदा औषधांचे डोस चुकतात किंवा उशिरा घेतले जातात. [3] , [4] ह्या अडथळ्यांमुळे काळजीच्या दृष्टिकोनाची गरज अधोरेखित होते, हा दृष्टिकोन  केवळ क्लिनिकल परिणामांपुरते मर्यादित न राहता रुग्णाचा अनुभव, स्वीकारार्हता आणि जीवनाची गुणवत्ता याचाही विचार करतो.  #InhaleTheChange च्या माध्यमातून, सिप्ला या आव्हानांकडे लक्ष वेधण्याचा आणि रुग्णांच्या निवडीला व आत्मविश्वासाला पाठिंबा देणाऱ्या, माहितीपूर्ण व लांछनमुक्त  संवाद साधण्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…