
no images were found
न्यू पॉलिटेक्निकचा ३९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकचा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी ३९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. वर्धापनदिनी प्राचार्य डॉ. संजय दाभोळे व सर्व स्टाफच्या उपक्स्थतीत कोलानिमधील सर्वात ज्येष्ठ कर्मचारी म्हणून सिव्हील इंजिनिअरिंग प्रवभागिमुख डॉ. विनायक दिवाण यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव झाला.
न्यू पॉलिटेक्निकची स्थापन ९ ऑगस्ट १९८३ रोजी संस्थेच्या शिवाजी पेठ कोल्हापूर येथील प्रांगणात झाली. सुरूवातीला तीन कोर्सेस घेऊन संस्थेने तंत्रशिक्षणामध्ये पहिले पाऊल टाकले. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून सद्ध्या येथे सहा कोर्सेस उपलब्ध आहेत. १९८३ पासून आजतागायत तंत्रशिक्षण घेवून बाहेर पडलेल्या तब्बल ३७ बचेस्मधील अभियंते विविध क्षेत्रात देशपातळीवर तसेच विदेशातही आपली सेवा बजावत आहेत. विशेष बाब म्हणजे, सुरूवातीच्या बचेसधील विद्यार्थ्यांची मुलेही आता न्यू पॉलिटेक्निकमधून अभियंता झालेली आहेत. या प्रसंगी सर्व विभागप्रमुख व स्टाफ यांनी आपल्या मनोगतामध्ये कॉलेजप्रती कृतज्ञता व्यक्त केली.