
no images were found
घरफाळा विभागाच्यावतीने 1 लाख 58 हजार 500 बिले जनरेट
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाची सुमारे 1 लाख 58 हजार 500 इतकी बिले जनरेट करण्यात आलेली आहेत. हि सर्व बिले पोष्ट ऑफीस व्दारे वितरीत करण्याची कार्यवाही घरफाळा विभागामार्फत सुरू आहे. महानगरपालिकेच्यावतीने 30 जून 2024 पर्यंत संपुर्ण घरफाळा भरलेस नागरीकांना करामध्ये 6 टक्के सवलत योजना सुरु करण्यात आहे. करदात्यांना पोष्ट ऑफीसव्दारे बिले वितरीत होण्यास विलंब झाल्यास शहरातील मिळकतधारकांनी आपला करदाता क्रमांक किंवा जुनी घरफाळा पावतीद्वारे नागरी सुविधा केंद्रात जावून घरफाळा रक्कम भरून या सवलत योजनेचा लाभ घेता येईल. तसेच मिळकतधारकांना ऑनलाइन, गुगल-पे व फोन-पे व्दारेही आपले देयक भरता येणार आहे. तरी शहरातील मिळकतधारकांनी सन 2024-25 ची घरफाळा रक्कम भरुन 6 टक्के सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.