
no images were found
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
कोल्हापूर : अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2023-24 चे अर्ज भरण्यासाठी व सन 2022-23 या वर्षातील अर्ज नुतनीकरणसाठी दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून दि.31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली होती. तथापि सन 2023-24 चे अर्ज भरण्यासाठी दि.30 एप्रिल 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर भरुन घ्यावेत. तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज नुतनीकरण करायचे राहिले असतील, त्यांचे अर्ज नुतनीकरण करावेत. महाविद्यालयांनी अर्जांची छाननी करुन परीपुर्ण असलेले अर्ज तात्काळ ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत. दि.30 एप्रिल 2024 ही अंतिम मुदत असल्याने मुदतीत अर्ज भरण्याची व मंजूर करण्याची कार्यवाही पुर्ण करावी, असे अवाहनही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.