Home मनोरंजन नई पीढी नए किस्से’ मालिकेच्या सेट्सवर कचरा टाकण्याबाबत सुमित राघवन आणि परिवा प्रणतीचे झीरो-टॉलरन्स धोरण

नई पीढी नए किस्से’ मालिकेच्या सेट्सवर कचरा टाकण्याबाबत सुमित राघवन आणि परिवा प्रणतीचे झीरो-टॉलरन्स धोरण

7 second read
0
0
35

no images were found

नई पीढी नए किस्से’ मालिकेच्या सेट्सवर कचरा टाकण्याबाबत सुमित राघवन आणि परिवा प्रणतीचे झीरो-टॉलरन्स धोरण

 

सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिका सामान्य माणसाचे सुंदर चित्रण करते आणि त्याला दररोज कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे दाखवते. या मालिकेत अनुक्रमे राजेश आणि वंदनाची भूमिका करणारे कलाकार सुमित राघवन आणि परिवा प्रणती सेटवर चांगल्या सवयी आणि परंपरा रुजवण्याचा प्रयत्न करत असतात. उत्तम अभिनय करणारे हे दोन्ही कलाकार आता वागले की दुनियाच्या सेटवरचे सफाई पोलीस बनले आहेत जणू! कारण त्यांनी सेटवर स्वच्छतेच्या बाबतीत हयगय खपवून घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सेटवर केळ्याची साले, कागदाचे कपटे, कचरा इतःस्ततः पडलेले नाहीत ना याकडे सुमित आणि परिवा यांची करडी नजर असते. स्वच्छता राखण्यासाठी त्यांनी एक उत्तम उपाय शोधला आहे. सेटवर जो कोणी कचरा टाकताना पकडला जाईल, त्याला दंड म्हणून 100 रु. ची शिक्षा करण्यात येईल असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. हा उपाय थोडा विचित्र आहे पण तो जबाबदारीने लागू करण्यात आला आहे, जेणे करून लोक या बाबतीत जागरूक व्हावेत आणि कामाची जागा स्वच्छ राहावी हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि, ‘बदलाची सुरुवात स्वतःपासून होते’ हे त्यांनी जाणले आहे!

राजेशची भूमिका करत असलेला सुमित राघवन म्हणाला, “स्वतः उदाहरण देऊन मगच त्या गोष्टीचा आग्रह धरावा हे माझे ब्रीद आहे. मला आणि परिवाला आमचा सेट आणि मेकअप रूम्स स्वच्छ ठेवायला आवडतात. तरीही, कोणाचाही वाढदिवस असला तरी सगळे जण केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी माझ्याच खोलीत गोळा होतात आणि मग खोलीत कचरा करून जातात. सगळे गेल्यानंतर मी माझी मेकअप रूम पुन्हा स्वच्छ करतो. आणखी एक गोष्ट म्हणजे, सेटवर आम्ही दररोज जवळजवळ 12 तास घालवतो. त्यामुळे सेट स्वच्छ ठेवणे आमच्याच हिताचे आहे. म्हणून आम्ही ही युक्ती शोधून काढली आहे की सेटवर कचरा करणाऱ्याला दंड करण्यात येईल. कोणीही कचरा करताना पकडले गेले, तर त्यांना दंड होईल, मग ते अभिनेते असोत, दिग्दर्शक असो किंवा स्पॉट बॉयसकट कोणीही क्रू सदस्य असो.”

 वंदनाची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणाली, “लोकांनी आपल्या आसपासच्या परिसराची काळजी घेतली पाहिजे. तेथे घाण करू नये. सेटवर स्वच्छता राखण्याचे मिशन मी आणि सुमितने हाती घेतले आहे. केवळ कामाची जागा स्वच्छ ठेवणे इतकाच यामागील उद्देश नाही, तर प्रत्येकामध्ये ही जबाबदारीची जाणीव रुजवणे हा मुख्य उद्देश आहे. आपले घर आणि कामाची जागा येथे आपण सहज काही बदल आणू शकतो. आणि, सेट स्वच्छ ठेवण्यासाठी किंमत मोजावी लागते. ‘स्वच्छ भारत अभियान’साठी आमचे हे योगदानच समजा ना!”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता : आमदार श्री.राजेश क्षीरसागर

पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता : आमदार श्री.राजेश क्षी…