
no images were found
सदरबाजार मुख्य रस्ता वाहतूकीसाठी बंद
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातच्या हद्दीमधील प्र.क्र.17 अंतर्गत सदरबाजार निंबाळकर झोपडपट्टी जवळील रस्ता ते नाज हॉटेलकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणासाठी व सदर बाजार मस्जीद समोरील रस्त्याचे क्रॉसड्रेन करण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात येणार आहे. हे काम दि.27 मार्च ते दि.27 एप्रिल 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागणार आहे. त्यामुळे नागरीकांना ये जा करण्यासाठी गोल्ड जीम मागील बाजूचा रस्ता, शास्त्री उद्यान ते सदरबाजार मस्जीद या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.