no images were found
शिक्षिकेने डोके भिंतीवर आपटल्याने विद्यार्थी जखमी
पुणे : पुण्यात विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
विमाननगर परिसरातील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार घडला आहे. कोमल असे यांशिक्षिकेचे नाव असून या प्रकरणी विद्यार्थ्याचे वडील अश्रफ मेहबूब शरीफ यांनी विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील वडगाव शिंदे रस्त्यावर हे इंग्लिश मिडीयम स्कूल आहे. या स्कूलमध्ये अरहन शरीफ(वय ७) हा शिकत आहे. १५ सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या मुलाचे आणि शाळेतील काही मुलांचे भांडण सुरू होती. ही गोष्ट शिक्षिकेला समजल्यानंतर म्युजिक टीचर असलेल्या शिक्षिकेने अरहान याचे तोंड जोरात दाबून धरले. त्याला मारहाण केली. त्याचे भिंतीवर दोन वेळा डोके आपटले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला क्लास मधून काढून टाकेन अशी भीती घातली दिली. ही घटना घडल्यानंतर अरहान हा दबावाखाली होता. त्यामुळे तो आजारी पडला. याबाबत आर वडिलांना शंका आल्याने त्याला असे वडिलांनी विश्वासात घेऊन त्याला विचारले. त्यानंतर त्याने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी विमानतळ पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.याबाबत अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.