no images were found
कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गासाठीचे कोल्हापूर विभागात भूसंपादन पूर्ण
कोल्हापूर : रत्नागिरी महामार्गासाठीचे भूसंपादन पूर्ण झाले असून, पहिल्या टप्प्यात या भागातील 964 शेतकर्यांना तब्बल 336 कोटी 81 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.उर्वरित 850 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. भूसंपादनासाठीची सर्वच रक्कम उपलब्ध झाल्याने सर्वच शेतकर्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महामार्गासाठी पाच वर्षांपासून सुरू असणारी भूसंपादनाची प्रक्रिया यंदा पूर्ण झाली. महामार्गासाठी आंबा ते चोकाक या 74 कि.मी. अंतरासाठी 332.67 हेक्टर जमीन संपादित केली आहे. या भूसंपादनासाठी प्रतिगुंठा दोन ते अडीच लाख रुपये नुकसानभरपाई मिळाल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले.