no images were found
अकोला जिल्ह्यात सरपंचपदी शिवशक्ती-भिमशक्तीचे नंदकिशोर गोरले
अकोला : आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विविध पक्षांकडून या निवडणुकीत विजयाचा दावा जरी करण्यात येत असला तरीही भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा गटाचे पारडे जड झाल्याची चिन्हे आहेत. उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती ती नंदकिशोर गोरलेंसह सर्व उमेदवारांच्या विजयाने प्रत्यक्षात खरी झाली. अकोला जिल्ह्यात यामुळे शिवशक्ती-भिमशक्तीचे खाते उघडले गेले आहे. राज्यातील अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ही पहिली ग्रामपंचायत ठाकरे-आंबेडकर यांना मिळाली आहे. सर्वच्या सर्व सात सदस्यही विजयी झाले आहेत. अकोला ग्रामपंचायत निकालात शिवसेनेने बाजी मारत दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. व्याळा आणि धारुर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.