no images were found
स्वराज्य संघटनेची निवडणुकीत बाजी
आज एकूण ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले होते. आता मतमोजणीनुसार निकाल समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजीराजेंनी महाराष्ट्रात अनेकवेळा आंदोलन करून आवाज उठविला होता. स्वराज्य संघटनेने ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी विजय मिळविला असून आता महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाच्या माध्यमातून स्वराज्य संघटनेला कामगिरीची संधी मिळाली असून स्वराज्य संघटना आता जोरदार कामगिरी करेल, असा विश्वास स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केला आहे. स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी घोडदौड सुरू आहे. धाराशिव या ठिकाणी सरपंचासह १३ सदस्य निवडून आले असून नाशिकमध्ये सरपंचासह सदस्यपदी कार्यकर्ते निवडून आलेले आहेत. आतापर्यंतच्या निकालानुसार स्वराज्य संघटनेच्या ३ ग्रामपंचायत विजयी ठरल्या आहेत. विजयी ठरलेल्या ग्रामपंचायती – १) नाशिक जिल्ह्यातील गणेशगाव, २) वासोल गाव, ३) तडवला (जि. धाराशिव).